पृथ्वीराज चव्हाणांनी उपजिल्हा रूग्णालयात जाऊन घेतली कोरोनाची लस - Prithviraj Chavan went to the sub-district hospital and got the corona vaccine | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

पृथ्वीराज चव्हाणांनी उपजिल्हा रूग्णालयात जाऊन घेतली कोरोनाची लस

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 एप्रिल 2021

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण सापडण्याचा वेग वाढला आहे. दररोज ७५८ बाधित रूग्ण सापडत आहेत. कोरोनाची चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. तसेच लसीकरणाची प्रक्रियाही आजपासून उपकेंद्रांवर सुरू करण्यात आली आहे. दररोज साधारण एका उपकेंद्रावर शंभर जणांना कोविड लसीकरण केले जाणार आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सध्या वाढला असून जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. आज कऱ्हाड येथील कै. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात जाऊन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोनाची लस घेतली. यावेळी त्यांनी लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरीकांनी लसीकरण करून घ्यावे. कोरोनाविरोधातील लढाईत सहभाग नोंदवून आपली व आपल्य कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले आहे. 

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण सापडण्याचा वेग वाढला आहे. दररोज ७५८ बाधित रूग्ण सापडत आहेत. कोरोनाची चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. तसेच लसीकरणाची प्रक्रियाही आजपासून उपकेंद्रांवर सुरू करण्यात आली आहे. दररोज साधारण एका उपकेंद्रावर शंभर जणांना कोविड लसीकरण केले जाणार आहे. सध्या विविध रूग्णालयात पाच हजार सात रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाच्या लसीकरण मोहिमेतंर्गत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड येथील कै. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात जाऊन कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. लसीकरणानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कोरोना लसीकरण मोहिम सुरू असून पात्र असणाऱ्या नागरीकांनी नोंदणी करून लसीकरण करून घ्यावे. कोरोना विरोधातील लढाईत सहभाग नोंदवून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख