कऱ्हाड पालिकेच्या अधिकाऱ्यांवर पृथ्वीराज चव्हाण संतापले.... - Prithviraj Chavan is angry with the officials of Karad Municipality .... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

कऱ्हाड पालिकेच्या अधिकाऱ्यांवर पृथ्वीराज चव्हाण संतापले....

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 31 मार्च 2021

नागरीकांची सेवा करण्यासाठी रूग्णवाहिका दिली होती. ती पालिकेने ताब्यात का घेतलेली नाही, हे कोडे आहे. त्याचा अहवाल मागितला आहे. कऱ्हाड पालिकेला रूग्णवाहिका नको असेल तर त्यांनी तसा ठराव करून द्यावा तो निधी शहरातील अन्य कामासाठी वळवता येईल. रूग्णवाहिका न वापरण्याबाबत कोणाचा दबाव असेल तर तसेही त्यांनी स्पष्ट करावे. 

कऱ्हाड : आमदार निधीतून कऱ्हाडसाठी देण्यात येणाऱ्या रूग्णवाहिकेचे नक्की काय झाले, त्याचा सविस्तर अहवाल त्वरीत द्यावा. रूग्णवाहिका नको असल्यास पालिकेने तो ठराव द्यावा. तो निधी अन्य कारणासाठी वळवता येईल, अशा कडक शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आजच्या पालिकेच्या आढावा बैठकीत पालिका अधिकाऱ्यांना सुनावले. 

आमदार चव्हाण यांच्या निधीतून कऱ्हाड व मलकापूर पालिकांना दोन वेगवेगळ्या रूग्णवाहिका दिल्या आहेत. त्यात मलकापूरला रूग्णवाहिका मिळाली. मात्र सहा महिने झाले तरिही कऱ्हाडची रूग्णावाहिका आलेली नाही. त्यावरून माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी आज अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले. 

कोविडच्या पहिल्या लाटेच्या पार्श्वभूमिवर कऱ्हाड शहरासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिकेला रुग्णवाहिका घेण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. दुसरी कोरोनाची लाट आली तरी पालिकेत रूग्णवाहिका आलेली नाही. ते लक्षात येताच श्री. चव्हाण यांनी आजच्या आढावा बैठकीत आधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारला. 

अत्यंत कडक भाषेत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. त्यांनी शासनाच्या दिरंगाईने ती रूग्णवाहिका कराड शहरवासींयासाठी आली नसेल तर तसा खुलासा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्वरीत करण्याचे आदेश दिले. तसेच रूग्णवाहिका का आली नाही, याची चौकशी करण्याचे आदेश दिले.  श्री. चव्हाण म्हणाले, कऱ्हाड व मलकापूर शहरासाठी प्रत्येकी एक रूग्णवाहिका मंजूर होती.

त्यानुसार मलकापूरची रूग्णवाहिका आली. मात्र कऱ्हाडची रूग्णवाहिका आलेली नाही. नागरीकांची सेवा  करण्यासाठी रूग्णवाहिका दिली होती. ती पालिकेने ताब्यात का घेतलेली नाही, हे कोडे आहे. त्याचा अहवाल मागितला आहे. कऱ्हाड पालिकेला रूग्णवाहिका नको असेल तर त्यांनी तसा ठराव करून द्यावा तो निधी शहरातील अन्य कामासाठी वळवता येईल. रूग्णवाहिका न वापरण्याबाबत कोणाचा दबाव असेल तर तसेही त्यांनी स्पष्ट करावे. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख