Prabhakar Deshmukh is MLA in the minds of the people: Rohit Pawar
Prabhakar Deshmukh is MLA in the minds of the people: Rohit Pawar

या कारणांसाठी रोहित पवारांनी केले प्रभाकर देशमुखांचे कौतूक....

माण-खटावला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी आपली ताकद प्रभाकर देशमुख यांच्या पाठीशी उभी करून विकासाचे काम पुढे न्यावे असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

दहिवडी : माण-खटावच्या जनतेला कायमस्वरुपी पाणी मिळावे यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून पाठपुरावा करुन पाण्याचा प्रश्न सोडविण्याची खरी तळमळ प्रभाकर देशमुख यांच्यात आहे. त्यामुळे माण-खटावच्या जनतेच्या मनातील आमदार प्रभाकर देशमुख हेच आहेत असे मत कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले.

आमदार रोहित पवार यांच्या हस्ते बनगरवाडी (ता. माण) येथील वाघमोडेवस्ती येथील तलावात उरमोडी व तारळी योजनेच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, अभयसिंह जगताप, बाळासाहेब सावंत, कविता म्हेत्रे, बाळासाहेब जगताप, विक्रम शिंगाडे, संजय जगताप, धीरज जगताप, सुनील थोरात, भागवत अनुसे, ऋषी जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार रोहित पवार म्हणाले, अतिशय प्रामाणिकपणे काम करुन येथील जनतेचे प्रश्न सोडविण्याची धमक प्रभाकर देशमुख यांच्यात आहे. प्रशासनातील अनुभवसंपन्न असणारे हे व्यक्तिमत्त्व आपल्या गावासोबत, मातीसोबत कधीही नाळ तुटणार नाही, यासाठी झटत आहेत. माण-खटावच्या दुष्काळी भागातील कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा देत प्रत्यक्ष कामांच्या पूर्ततेसाठी त्यांची धडपड सुरु असते. 

माण-खटावला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी आपली ताकद प्रभाकर देशमुख यांच्या पाठीशी उभी करून विकासाचे काम पुढे न्यावे असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. यावेळी भोजलिंग पाणी संघर्ष समितीचे सर्व सदस्य आणि पाणी योजनेमुळे सुखावलेले पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com