शंभूराज देसाईंच्या तालुक्यात पोलिस प्रशिक्षण केंद्र; सैनिक स्कुलला तीनशे कोटी...

पाटण येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरूकरण्याबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मागणीनुसार या अर्थसंकल्पात या केंद्राला मंजूरी मिळाली आहे. आता हे केंद्र सुरू करण्यासोबतच इतर कामांसाठी गृहविभागासाठी 1812 कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पाटण तालुक्‍यात पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरू होण्यास चालना मिळाली आहे.
Police Training Center in Shambhuraj Desai's taluka; Three hundred crores to Sainik School ...
Police Training Center in Shambhuraj Desai's taluka; Three hundred crores to Sainik School ...

सातारा : सैनिक स्कुलला तीनशे कोटींची तरतूद तर पाटणला पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या निर्णयाला मंजूरी देत महाबळेश्‍वर, पाचगणीच्या विकास आराखड्यास निधी देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात घेतला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात याबाबतची घोषणा केली. त्यामुळे सातारकरांच्या महत्वाच्या अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असल्याची चर्चा आहे. दरम्यान साताऱ्यातील शासकिय मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. 

राज्य सरकारचा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्याला काय मिळणार याकडे सातारच्या जनतेचे लक्ष लागले होते. साताऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झुकते माप दिले आहे. यामध्ये सैनिक स्कुलच्या विकासासाठी तीनशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी प्रत्येक वर्षी शंभर कोटी प्रमाणे निधी दिला जाणार आहे.

तसेच पाटण येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरूकरण्याबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मागणीनुसार या अर्थसंकल्पात या केंद्राला मंजूरी मिळाली आहे. आता हे केंद्र सुरू करण्यासोबतच इतर कामांसाठी गृहविभागासाठी 1812 कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पाटण तालुक्‍यात पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरू होण्यास चालना मिळाली आहे. 

तसेच महाबळेश्‍वर व पाचगणीचा विकास आराखड्यास मान्यता मिळत्तली असून त्यासाठी निधीही उपलब्ध केला जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात महाबळेश्‍वरात येणाऱ्या पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा मिळणार आहेत. तसेच सातारकरांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शासकिय मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लागला असून हे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा निर्णय आजच्या अर्थसंकल्पात मान्यता दिली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात झुकते माप दिले आहे. सातारकरांतून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 

सैनिक स्कुलला मिळणार ऊर्जितावस्था.....

सैनिक स्कुलसाठी निधी मिळावा, तसेच त्याला ऊर्जितावस्था मिळावी यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी सातत्याने मागणी केली होती. त्यास मुहूर्तस्वरूप आले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात सैनिक स्कुलसाठी तब्बल तीनशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी तीन टप्प्यात मिळणार आहे. त्यामुळे सैनिक स्कुलमध्ये आणखी चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com