पोलिस, होमगार्डला धक्काबुक्की पडली महागात; नेले चालवत न्यायालयात

"येथे नागरी वस्ती आहे, तुम्ही येथून घरी जा', असे सांगून त्यांना त्यांनी हटकले. त्यावेळी ते चोघेही कोरडे व होमगार्डच्याअंगावर धावून गेले. त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. ही माहिती कोरडे यांनी पोलिसांत दिली.
Police and home guards beaten by drunkards in Oglewadi
Police and home guards beaten by drunkards in Oglewadi

कऱ्हाड : दारू पिणाऱ्यांना हटकणाऱ्या पोलिस व त्याच्यासोबतच्या गृहरक्षक दलाच्या जवानास (होमगार्ड) धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. ओगलेवाडी येथे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

या प्रकरणी चौघांना ताब्यात घेऊन न्यायालयात घेऊन जाताना वाहनात बिघाड झाल्याने त्यांना चालवत न्यायालयात हजर केले. तेथे त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पंकज संजय डुबल (वय 26), रोहित शशिकांत चन्ने (28), चैतन्य बाळासाहेब होवाळ (25) व अल्ताफ सिकंदर शेख (22, चौघेही रा. ओगलेवाडी परिसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

त्यांच्याविरोधात हवालदार धीरज कोरडे यांनी फिर्याद दिली आहे. हवालदार कोरडे व त्यांच्यासोबत एक होमगार्ड बीट मार्शलसोबत गस्त घालत होते. त्यावेळी ओगलेवाडीला येताना त्यांना आरडाओरडा झाल्याचा आवाज झाला. ते आवाजाच्या दिशेने गेले. त्यावेळी संबंधित चौघेही तेथे दारू पित बसले होते.

"येथे नागरी वस्ती आहे, तुम्ही येथून घरी जा', असे सांगून त्यांना त्यांनी हटकले. त्यावेळी ते चोघेही कोरडे व होमगार्डच्या अंगावर धावून गेले. त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. ही माहिती कोरडे यांनी पोलिसांत दिली. पोलिसही तत्काळ घटनास्थळी पोचले. संबंधित चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना न्यायालयात नेताना पोलिस वाहन खराब झाले होते. त्यामुळे पोलिसांनी त्या चौघांनाही चालवत न्यायालयात हजर केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com