राज्याच्या अर्थसंकल्पातून फलटणला २७५ कोटींचा भरघोस निधी....

फलटण शहर व तालुक्यातील रस्ते, पूल, प्रा. शाळा, अंगणवाडी इमारती, अन्य विकास कामे यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून 274 कोटी 98 लाख रुपयांची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
Phaltan gets Rs 275 crore from state budget says Ramraje Naik Nimbalkar
Phaltan gets Rs 275 crore from state budget says Ramraje Naik Nimbalkar

फलटण : फलटण शहर व तालुक्यातील विविध विकासकामांसाठी नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात तब्बल २७५ कोटींची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. तर फलटण- सातारा रस्त्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक निधीतून १७६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातून या संपूर्ण मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण होणार आहे, अशी माहिती विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.

राज्याच्या अर्थसंकल्पातून फलटण शहरासह तालुक्याला मोठ्याप्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण
नगरपरिषदेच्या ज्येष्ठ नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे उपस्थित होते.

फलटण शहर व तालुक्यातील रस्ते, पूल, प्रा. शाळा, अंगणवाडी इमारती, अन्य विकास कामे यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून 274 कोटी 98 लाख रुपयांची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

याची सविस्तर माहिती देताना रामराजे म्हणाले, एशियन डेव्हलपमेंट बँक सहाय्य निधीतून राज्याच्या अर्थसंकल्पिय तरतुदीद्वारे फलटण-सातारा रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण 176 कोटी, फलटण शहरातील रस्त्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 12 कोटी, ग्रामीण भागातील विविध रस्ते पुलांसाठी अर्थसंकल्पीय तरतुदींमधून 63 कोटी, नाबार्ड 26 मधून चार रस्त्यावरील पुलांसाठी चार कोटी 91 लाख.

स्थानिक विकास निधीतून 7 कोटी 9 लाख, अर्थसंकल्पीय तरतुदी व अन्य योजनांतून जिल्हा परिषद बांधकाम विभाग 11 कोटी,दलित वस्ती सुधार योजनेतून 98 लाख असे एकूण 274 कोटी 98 लाख रुपये मंजूर झाले आहेत. फलटण-सातारा (आदर्की-मिरगाव- फलटण) वाठार निंबाळकर फाटा ते आदर्की फाटा (फौजी ढाबा) हा संपूर्ण रस्ता 10 मीटर रुंदीने सिमेंट काँक्रीटचा करण्यासाठी  एशियन डेव्हलपमेंट बँक सहाय्य निधीतून राज्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदींमधून 176 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com