सर्वच पक्षात लोक घुसखोरी करून आमदार झालेत.....

भाजपत तब्बल दोन डझन आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बाहेरचे लोक आमदार आहेत. आमच्या सारखे काही थोडेच एकाच पक्षाचे एकनिष्ठ आहेत.
सर्वच पक्षात लोक घुसखोरी करून आमदार झालेत.....
People from all parties have infiltrated and become MLAs .....

जळगाव : आज कोणीही ठामपणे सांगू शकत नाही हा माझा पक्ष आहे, सर्वच पक्षात बाहेरचे लोक घुसखोरी करून आमदार झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात राजकीय वाद बाजूला ठेवून सर्वांनी विकासासाठी एक होण्याची गरज आहे, असे मत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. People from all parties have infiltrated and become MLAs .....

भालोद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या धान्यासाठी चाळण व प्रतवारी यंत्रणा उभारली आहे. या प्रकल्पाचे माजी खासदार तथा माजी आमदार हरिभाऊ जावळे असे नामकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते झाले.

याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, स्वर्गीय हरिभाऊ जावळे एक अजातशत्रू होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी आपले राजकीय आयुष्य खर्च केले आहे. विकास कामासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त त्यांनी व्यक्त केली.  ते म्हणाले आज कोणीही एका पक्षाचा सांगू शकत नाही, सर्वच पक्षात बाहेरचे लोक घुसखोरी करून आमदार झाले आहेत.

भाजपत तब्बल दोन डझन आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बाहेरचे लोक आमदार आहेत. आमच्या सारखे काही थोडेच एकाच पक्षाचे एकनिष्ठ आहेत. त्याकरिता आपण विनंती करण्यात करतो की ज्याने त्याने ज्याचा त्याचा पक्ष वाढवावा. मात्र विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे. यावेळी व्यासपीठावर भाजपाच्या खासदार रक्षाताई खडसे, जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजू मामा भोळे तसेच भाजप व शिवसेनेचे नेते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in