पडळकर बत्ताशावरील पैलवान; त्यांची लायकी बारामतीकरांनी दाखवून दिलीय..... 

राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करताना आपली जनमानसातील लायकी आठवणीत ठेऊन टीका करावी. अन्यथा, त्यांना जशास तसे उत्तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून देण्यात येईल.
Padalkar should use words carefully; Baramatikar has shown his worthiness .....
Padalkar should use words carefully; Baramatikar has shown his worthiness .....

मलवडी : विधान परिषदेची आमदारकी मिळाल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार घराण्यावर खालच्या भाषेत टीका करण्याचे उद्योग सुरू केले आहेत. आमदार पडळकर हे कुस्तीच्या फडातील बत्ताशावरील पैलवाना सारखे फडाला रंग आणायचे काम करताना दिसून येत आहेत. यापुढे त्यांनी आपल्या वाणीला विराम द्यावा. अन्यथा, राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रशांत विरकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे. Padalkar should use words carefully; Baramatikar has shown his worthiness .....

आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजपच्या निवडणूक चिन्हावर बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपा या राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार असून देखील त्या ठिकाणी त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. हे त्यांच्या लायकीला साजेल असे उत्तर जनतेने त्यांना दिलं होतं. तरी देखील पडळकर भाजप नेत्यांची व अंध भक्तांची करमणूक करण्यासाठी माकड चाळे करत आहेत.

आमदार पडळकर हे कुस्तीच्या फडातील बत्ताशावरील पैलवाना सारखे फडाला रंग आणायचे काम करताना दिसून येत आहेत. यापुढे त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करताना आपली जनमानसातील लायकी आठवणीत ठेऊन टीका करावी. अन्यथा, त्यांना जशास तसे उत्तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून देण्यात येईल. 

सोलापूर येथे आमदार पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ला हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या व पवारसाहेबांवर प्रेम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. त्यामुळे यापुढे पडळकर यांनी शब्द जपून वापरावेत. पडळकरांनी पवारसाहेबांवर बोलण्यापेक्षा केंद्र शासनाच्या आख्यारित येणाऱ्या धनगर आरक्षण व ओबीसींचे राजकीय आरक्षण यासाठी आपल्या नेत्यांवर दबाव आणावा, असा सल्ला प्रशांत विरकर यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com