सातारा तालुक्यात रूग्ण संख्या वाढली; विनाकरण फिरणाऱ्यांची होणार कोरोना चाचणी
satara city

सातारा तालुक्यात रूग्ण संख्या वाढली; विनाकरण फिरणाऱ्यांची होणार कोरोना चाचणी

वाढलेला संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये विनाकारण बाहेर हिंडणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी कोरोना चाचणी करण्याचे आदेश तहसिलदार आशा होळकर यांनी दिला आहे. त्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व पालिकेचे मुख्याधिकारी यांनी पोलिसांच्या मदतीने दोन पथके तयार करावीत.

सातारा : सातारा शहरासह तालुक्‍यात कोरोनाचे रूग्ण मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. त्यातच विनाकारण बाहेर पडणाऱ्यांचे प्रमाणही वाढलेले आहे. दररोज सकाळी होणारी गर्दी टाळण्यासाठी व विनाकारण फिरणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी सातारा शहरासह तालुक्यात दोन पथकांमार्फत कोरोना चाचणी करण्याचे आदेश तहसिलदारांनी दिले आहेत. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांना आता कोरोना चाचणीचा सामना करावा लागणार आहे. यामध्ये कोणी कोरोना बाधित आढळल्यास त्याची रवानगी कोरोना सेंटरमध्ये होणार आहे. 

सातारा तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. रूग्णसंख्याही मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वाढलेला संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये विनाकारण बाहेर हिंडणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी कोरोना चाचणी करण्याचे आदेश तहसिलदार आशा होळकर यांनी दिला आहे. त्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व पालिकेचे मुख्याधिकारी यांनी पोलिसांच्या मदतीने दोन पथके तयार करावीत.

त्यांच्यामार्फत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करावी. तसेच पोलिसांकडूनही संबंधितांवर कारवाई करावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे सातारा शहरासह तालुक्‍यात विनाकारण फिरणाऱ्यांना चाप बसणार आहे. या चाचणीत कोणी बाधित असल्याचे आढळल्यास संबंधितांना कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in