गोकुळ निवडणूकीत मुश्रीफांचा अति आत्मविश्‍वास : अरुण नरके

गोकुळ निवडणूक लढविण्यासाठी शेकडो अर्ज येतात. यावरूनच सत्तारूढ संचालकांनी गोकुळ चांगला चालवला आहे. त्यामुळेच गोकुळवर सर्वांच्या उड्या पडत असल्याचेही श्री नरके यांनी सांगितले.
गोकुळ निवडणूकीत मुश्रीफांचा अति आत्मविश्‍वास : अरुण नरके
Mushrif's overconfidence in Gokul elections says Arun Narke

कोल्हापूर : आम्ही विजयी झालो आहोत. फक्त अध्यक्ष निवड बाकी आहे, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे मत हे अति आत्मविश्‍वासाचे आहे. त्यांना वाटत आम्हीच निवडूण येणार पण मतदारांनी सत्तारूढ संचालकांनाच निवडूण द्यायचे ठरवले आहे. तर, पालकमंत्री सतेज पाटील आणि श्री मुश्रीफ यांनी 85 टक्के परतावा देतो म्हणून सांगितले आहे. पण प्रत्यक्ष तसे होत नाही. उगाच बोलाचे म्हणून काही तरी बोलाचं असतं, अशीही टिका गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी आज केली. 

महालक्ष्मी सारखा संघ मोडणाऱ्यांना सहकार कसा लावला हे वेगळे सांगायला नको, असेही श्री नरके म्हणाले. श्री नरके म्हणाले, कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) खूप चांगला चालला आहे. त्यामुळेच प्रत्येकाला गोकुळची निवडणूक लढवावी लागत आहे. गोकुळ निवडणूक लढविण्यासाठी शेकडो अर्ज येतात. यावरूनच सत्तारूढ संचालकांनी गोकुळ चांगला चालवला आहे. त्यामुळेच गोकुळवर सर्वांच्या उड्या पडत असल्याचेही श्री नरके यांनी सांगितले. 

सत्ता कोणाचीही येवू दे मी मार्गदर्शन करणार... 
 46 वर्ष मी गोकुळमध्ये काम करत आहे. त्यामुळे अर्धे आयुष्य गोकुळमध्ये गेले आहे. त्यामुळे, गोकुळमध्ये सत्ता कोणाचीही आली तरीही आपण प्रत्येकाला मार्गदर्शन करतच राहणार. विरोधक येवून जरी माझ्याकडून मार्गदर्शक घेत असतील तर मी त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचेही श्री नरके यांनी सांगितले. 

सत्तारूढ मधील दोन संचालक विरोधकांकडे गेल्यामुळे काहीही फरक पडणार नाही. कारण त्यांनी अध्यक्षपदासह 30 ते 35 वर्ष गोकुळकडून फायदा घेतला आहे. तसचे गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील यांचे शशिकांत पाटीलच वारसदार नाहीत तर आम्ही वारसदार आहोत. त्यामुळे शशिकांत पाटील कोठे गेले याला फारसे महत्व नसल्याचेही श्री नरके यांनी सांगितले. 

महालक्ष्मी संघ 
महालक्ष्मी संघासारख्या संस्था बुडवलेले विरोधी गटात आहे. त्यामुळे, गोकुळ सारख्या संस्थे काय करणार असाही सवाल नरके यांनी केला. 

क्रॉस मतदान होणारच 

गोकुळच्या यंदाच्या निवडणूकी मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक कोणालाही साधी-सोपी असणार नसल्याचेही श्री नरके यांनी सांगितले.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in