उदयनराजेंची निवडणूक स्ट्रॅटेजी; पालिका सभेत ४४ विषयांतून पाडणार निधीचा पाऊस

सातारकरांना अभिप्रेत असणारा विकास सातारा विकास आघाडीच्‍या माध्‍यमातून सातारा पालिका करीत असल्‍याचेही उदयनराजे यांनी निवेदनात नमुद केले आहे.
MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosale

सातारा : सातारा पालिकेच्‍या निवडणुकीचे पडघम वाजण्‍यास सुरुवात झाली असून सत्ताधारी सातारा विकास आघाडीने सातारा शहरासह विस्‍तारीत भागावर जास्‍तीचे लक्ष पुरविले आहे. येणाऱ्या पालिका सभेत विस्‍तारीत भागात पालिकेने सुमारे दोन कोटीहून अधिक खर्चाचे ४४ विषय मंजुरीसाठी ठेवले आहेत. या विषयांच्‍या मंजुरीनंतर विस्‍तारीत भागातील रखडलेल्‍या कामांसह नवीन कामे मार्गी लागणार असल्‍याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी निवेदनाव्‍दारे दिली आहे. MP Udayanraje's election strategy; Fund raining will be done in 44 issues in the municipal meeting
 
याबाबतच्‍या निवेदनात खासदार उदयनराजे यांनी पालिका सभेपुढे घेण्‍यात येणाऱ्या विषयांची माहिती दिली. यात शाहूपुरी, विलासपूर, दरे खुर्द, पिरवाडी, शाहूनगर, गोळीबार मैदान, विसावा नाका आदी भागातील नागरीकांनी पालिकेकडे विविध विकासकामे पूर्ण करण्‍याची मागणी केली होती. लोकांची मागणी आणि गरज लक्षात घेत त्‍यासाठीचा आराखडा, प्रस्‍ताव तयार करण्‍याचे काम पालिकेने हाती घेतले होते.

तयार झालेले आराखडे, प्रस्‍ताव नंतरच्‍या काळात स्‍थायी समितीच्‍या सभेत मांडण्‍यात येणार आहेत. यानंतर हे विषय सर्वसाधारण सभेपुढे मांडण्‍यात येणार आहेत. सातारा शहरासह विस्‍तारीत भागाच्‍या सर्वांगिण विकासाला चालना मिळावी, यासाठीचे हे विषय प्राधान्‍याने तयार करण्‍यात आले असुन यामुळे त्‍या भागातील विकासाला चालना मिळणार आहे. या कामांसाठी आवश्‍‍यक असणारा निधी उपलब्‍ध असून सातारकरांना अभिप्रेत असणारा विकास सातारा विकास आघाडीच्‍या माध्‍यमातून सातारा पालिका करीत असल्‍याचेही उदयनराजे यांनी निवेदनात नमुद केले आहे.

कोरोना, लॉकडाउन व इतर कारणांमुळे प्रशासकीय कामकाज थंडावल्‍याने पालिकेचे उत्‍पन्न कमी झाले आहे. असे असतानाही नागरीकांच्‍या हितास प्राधान्‍य देण्‍यासाठी पालिकेने नागरी समस्‍या सोडविण्‍यावर भर दिला आहे. गेली दीड वर्षे कोरोनाच्या हाहा:काराने संपूर्ण जग ग्रासले आहे. त्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांनाही मोठया प्रमाणावर बसला आहे. 

या कालखंडामध्ये शासकीय निधी, करवसुली याचा मोठया प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला तरी सुध्दा सातारा नगरपरिषदेने नागरीकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत नागरीकांच्या गरजा सोडवण्यावर भर दिला आहे. तीन सप्टेंबरला होणाऱ्या पालिकेच्या सभेत लहान मुलांपासून ज्‍येष्‍ठ नागरीकांना अभिप्रेत असणारी विकासकामे मंजुरीसाठी ठेवण्‍यात येत आहेत.

या कामांमध्‍ये बागा विकसन, अतिथीगृह बांधणे, रस्‍ते दुरुस्‍ती, डांबरीकरण, गटर योजना, दिवाबत्ती, बसथांबे विकसन, स्‍वागत कमानी उभारणे, पुल, संरक्षक कठडे बांधण्‍यासह इतर ४४ विषयांचा समावेश असून त्‍यासाठी सुमारे दोन कोटीहून अधिक रुपयांची तरतुद करण्‍यात येत असल्‍याचेही खासदार उदयनराजे यांनी निवेदनात नमुद केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com