विकेंड लॉकडाऊनमध्ये खासदार श्रीनिवास पाटील गहु काढणीत व्यस्त - MP Srinivas Patil busy harvesting wheat in weekend lockdown | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

विकेंड लॉकडाऊनमध्ये खासदार श्रीनिवास पाटील गहु काढणीत व्यस्त

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

खासदार श्रीनिवास पाटील यांनी घरी बसून न राहता थेट शेत गाठलं. शेतात गव्हाची काढणी सुरु होती. त्यांनी नेहमीचा पांढरा कुर्ता, जॅकेट आणि सलवार असे असा पेहराव न करताना साधी पॅन्ट, टी शर्ट घालुन शेतात सुरु असणाऱ्या गव्हाच्या काढणीसाठी सरसावले. हातात वीळा घेऊन गहू काढणीला मदत केली.

कऱ्हाड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लागू केलेल्या विकेंड लॉकडाऊनला साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी शेतातील गहु काढुन प्रतिसाद दिला. पुढारी  पोशाख बाजुला ठेऊन टी-शर्ट, साधी पँट घालून श्रीनिवास पाटील यांनी केलेली ही गहु काढणी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढु लागला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी काही निर्बंध लागु केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी शनिवार आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन लागु केला आहे. त्यामुळे आज सारे काही बंद होते. या विकेंड लॉकडाऊनमध्ये आज आणि उद्या संचारबंदी आहे. त्यामुळे खासदारांना भेटायला कोणीच येणार नाही.

त्याचा विचार करुन खासदार श्रीनिवास पाटील यांनी घरी बसून न राहता थेट शेत गाठलं. शेतात गव्हाची काढणी सुरु होती. त्यांनी नेहमीचा पांढरा कुर्ता, जॅकेट आणि सलवार असे असा पेहराव न करताना साधी पॅन्ट, टी शर्ट घालुन शेतात सुरु असणाऱ्या गव्हाच्या काढणीसाठी सरसावले. हातात वीळा घेऊन गहू काढणीला मदत केली. त्यांची ही गहु काढणी आज जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख