सक्तीच्या वीजबिल वसुलीवरून जयकुमार गोरे संतापले; महावितरणला ताळ्यावर आणणार  - MLA Jayakumar Gore is angry with MSEDCL over forced recovery of electricity bills | Politics Marathi News - Sarkarnama

सक्तीच्या वीजबिल वसुलीवरून जयकुमार गोरे संतापले; महावितरणला ताळ्यावर आणणार 

रूपेश कदम
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

वीजबिल भरल्याशिवाय ट्रान्स्फॉर्मर जोडणार नाही, अशी भूमिका महावितरण घेते. महिनोंमहिने डीपी जोडले जात नाहीत. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने हातातोंडाशी आणलेलं पीक फक्त वीज उपलब्ध न झाल्यामुळे वाया जात आहे. आधीच परिस्थितीने भरडलेल्या शेतकऱ्यांचे शोषण महावितरणकडून सुरू आहे.'' 

दहिवडी : कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहे. अशा स्थितीत जर महावितरणने सक्तीची वीजबिल वसुली थांबली नाही, तर महावितरणला ताळ्यावर आणण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची भूमिका आम्हाला तातडीने घ्यावी लागेल. महावितरणने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशारा भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिला आहे.
 
आमदार गोरे म्हणाले, "मागील दोन वर्षांत चांगला पाऊस झाल्यामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पिके आहेत. शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून शेतीपंपासाठी वीज जोडणी मागत आहेत. ती जोडणी देण्यास शासन कायम टाळाटाळ करत आहे. वीज जोडणी न दिल्यामुळे शेतकरी अवैधरीत्या विजेचा वापर करत आहेत. विजेचा वापर सुरूच आहे. त्यामुळे प्रत्येक ट्रान्स्फॉर्मर हे ओव्हर लोडेड आहेत.

ओव्हर लोडेड असल्यामुळे ट्रान्स्फॉर्मर जळण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. जळालेल्या ट्रान्स्फॉर्मरच्या ठिकाणी नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी जेव्हा शेतकरी महावितरणकडे जातात. त्या वेळी वीजबिल भरल्याशिवाय ट्रान्स्फॉर्मर जोडणार नाही, अशी भूमिका महावितरण घेते. महिनोंमहिने डीपी जोडले जात नाहीत. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने हातातोंडाशी आणलेलं पीक फक्त वीज उपलब्ध न झाल्यामुळे वाया जात आहे. आधीच परिस्थितीने भरडलेल्या शेतकऱ्यांचे शोषण महावितरणकडून सुरू आहे.'' 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख