कृष्णाची निवडणूक दुरंगी करणार; दोन मोहितेंच्या एकत्रिकरणाचा प्रयत्न : डॉ. विश्वजित कदम - Minister Vishwajit Kadam move in Krishna's election will bring the two Mohits together | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

कृष्णाची निवडणूक दुरंगी करणार; दोन मोहितेंच्या एकत्रिकरणाचा प्रयत्न : डॉ. विश्वजित कदम

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 19 एप्रिल 2021

या दोघांना एकत्र आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहिल. काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते एकत्रिकरणाला आग्रही आहेत. त्या अनुशंगाने चर्चेच्या फैरी सुरू आहेत. हे दोन नेते एकत्रित आल्यानंतर बाकीचे काय त्याचाही फैसला करू. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक निखारीची म्हणून लढणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सर्व ताकदीनीशी लढवणार असून डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यासाठी या निवडणूकीत साम-दाम-दंड-भेद या नितीचा अवलंब करत लागेल ती मदत केली जाईल. तसेच डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या एकत्रिकरणाची चर्चा असून आधी नेत्यांचे एकत्रिकरण व त्यानंतर कार्यकर्त्यांचे असा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.

डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या निवासस्थानी मंत्री विश्वजित कदम आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कृष्णा कारखान्याची निवडणूक आम्ही सर्व शक्तीनिशी लढणार आहोत, हे मी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. डॉ. इंद्रजित मोहिते यांना लागेल ती मदत करणार असून. या  निवडणुकीसाठी मी स्वतः कराडात तळ ठोकून बसणार आहे. काही झाले तरी या निवडणुकीत आम्ही मागे राहणार नाही. 

त्यासाठी जे जे करावे लागेल ते करणार आहे. कृष्णेची निवडणूक गतवेळी तिरंगी झाली होती. मात्र, यावेळी ती दुरंगी करण्याचा आमचा प्रयत्न असून डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांना एकत्रित आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्या अनुशंगाने आमच्या बैठकाही झाल्या आहेत. लग्न ठरवायचं म्हटलं तर प्रयत्न करावा लागतो.

त्याच पद्धतीने या दोघांना एकत्र आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहिल. काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते एकत्रिकरणाला आग्रही आहेत. त्या अनुशंगाने चर्चेच्या फैरी सुरू आहेत. हे दोन नेते एकत्रित आल्यानंतर बाकीचे काय त्याचाही फैसला करू. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक निखारीची म्हणून लढणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख