या प्रश्नांवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी पाळले मौन... - Mansukh Hiren and On the Sachin Vaze case Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai avoided comment | Politics Marathi News - Sarkarnama

या प्रश्नांवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी पाळले मौन...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 15 मार्च 2021

याप्रकरणात आक्रमक विरोधकांमुळे सरकार बॅकफुटवर गेले आहे का, या प्रश्‍नावर शंभूराज देसाई यांनी तसे काही झालेले नाही, सरकारचा तपास योग्य आहे. त्यातून कोणालाही पाठीशी घालण्यात येत नसल्याची प्रतिक्रिया दिली.

सातारा : मनसुख हिरेन मृत्युप्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणा करत असल्याने त्यावर मी जास्त भाष्य करणार नाही. हिरेन तसेच सचीन वाझे यांच्या प्रकरणात महाराष्ट्र सरकार बॅकफुटवर गेलेले नाही, असे मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. 
 
सातारा पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मंत्री देसाई यांच्याहस्ते आज सत्कार करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक गृह राजेंद्र साळुंखे व अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. 

सचीन वाझे प्रकरणात काही प्रशासकीय अधिकारी सरकारविरोधी भूमिका घेत असून सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधी गटास माहिती पुरवत असल्याच्या प्रश्‍नावर मंत्री देसाई म्हणाले, महाराष्ट्र एटीएस संपूर्ण देशभरात नावाजलेली तपास यंत्रणा आहे. या यंत्रणेने तपास करत अनेक धागेदोरे मिळवत योग्य मार्गावर तपास नेला होता. त्यांचा हा तपास सुरु असतानाच केंद्रीय तपास यंत्रणेने तो आपल्या हातात घेतला. ते सध्या तपास करत आहेत.

या दोन्ही यंत्रणांचा तपास केंद्रीय यंत्रणा करीत असल्याने त्यावर मी अधिक भाष्य करणार नाही. अंबानी यांच्या बंगल्याबाहेरील चारचाकीत सापडलेली स्फोटके नागपूर येथील एका कंपनीची असून ती कंपनी भाजपाच्या मातृसंस्थेच्या जवळीकीतील आहे, असे  विचारले असता मंत्री देसाई म्हणाले, आता त्याचाही तपास केंद्रीय यंत्रणाच करेल, असे त्यांनी सांगितले. याप्रकरणात आक्रमक विरोधकांमुळे सरकार बॅकफुटवर गेले आहे का, या प्रश्‍नावर शंभूराज देसाई यांनी तसे काही झालेले नाही, सरकारचा तपास योग्य आहे. त्यातून कोणालाही पाठीशी घालण्यात येत नसल्याची प्रतिक्रिया दिली.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख