दहा हजारांची लाच घेताना साताऱ्यात मंडलाधिकारी जाळ्यात - Mandal Adhikari caught in bribery while taking bribe of 10 thousand Rupees | Politics Marathi News - Sarkarnama

दहा हजारांची लाच घेताना साताऱ्यात मंडलाधिकारी जाळ्यात

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 मार्च 2021

दहा हजार रुपये लाच देण्याचे मान्य केल्यानंतर झनकर अर्ज निकाली काढण्यास तयार झाला. याची तक्रार नोंद केल्यानंतर त्याची शहानिशा करून झनकरला पकडण्यासाठी आज सायंकाळी शकुनी गणेश मंदिराजवळ सापळा लावण्यात आला. झनकर याने दहा हजार रुपये घेतल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने  त्याला पकडले.

सातारा :  पुनर्वसनाचा तक्रारी अर्ज निकाली काढण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सातारा तालुक्यातील तासगांव येथील मंडलाधिकारी संतोष शिवाजी झनकर याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री सातारा शहरातील शकुनी गणेश मंदीराच्या पाठीमागील मैदानात रंगेहाथ पकडले. झनकर याला ताब्यात घेतले आहे. 

त्याच्या घराची झडती घेण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी आणि सातारा शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी करत होते. याबाबत माहिती अशी की, सातारा तालुक्यातील तासगांव येथे कार्यरत असणारा मंडलाधिकारी संतोष शिवाजी झनकर (रा. गुरुवार पेठ, सातारा) याच्याकडे पुनर्वसनाच्या अनुषंगाने एक अर्ज आला होता. तो अर्ज निकाला काढावा म्हणून तक्रारदार सातत्याने प्रयत्न करत होता. 

मात्र, झनकर कार्यवाही करत नव्हता. दहा हजार रुपये लाच देण्याचे मान्य केल्यानंतर झनकर अर्ज निकाली काढण्यास तयार झाला. याची तक्रार नोंद केल्यानंतर त्याची शहानिशा करून झनकरला पकडण्यासाठी आज सायंकाळी शकुनी गणेश मंदिराजवळ सापळा लावण्यात आला. झनकर याने दहा हजार रुपये घेतल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने  त्याला पकडले. त्याची चौकशी करण्याचे काम सुरु असून त्याच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख