Major operation in the Satara District to deport five gangs at a time. | Sarkarnama

एसपी सातपुतेंची धडक कारवाई; पाच टोळ्या केल्या तडीपार

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 1 जुलै 2020

  या पुढील काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणाऱ्यांवर अशीच धडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे. तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे. 

सातारा : जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, वाहनचोरी तसेच अवैद्य धंदे करणाऱ्या पाच टोळ्यातील 17 जणांना पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी तडीपार केले आहे. एकाच वेळी पाच टोळ्या तडीपार करण्याची जिल्ह्यातील ही मोठी कारवाई आहे. एसपींच्या या कारवाईने 

सातारच्या एसपींनी केलेल्या या कारवाईत मेढा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिपक शामराव वारागडे (वय 45), सुनिल गोविंद गावडे (वय 32) व प्रवीण रामचंद्र वारागडे (वय 44, सर्व रा. कुडाळ, ता.जावळी) ही मटका व बेकायदेशीर दारू विकणारी टोळी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आली आहे. त्यांच्याविरूद्ध सहायक निरीक्षक एन. एम. राठोड यांनी प्रस्ताव पाठविला होता.

उंब्रज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अविनाश उर्फ भैय्या बापू जाधव (वय 25), अक्षय बापू जाधव (वय 21), समीर सुधीर दुधाणे (वय 24), प्रकाश जयसिंग जाधव (वय 30), रूपेश रविंद्र घाडगे (वय 20) व संतोष सुभाष कांबळे (वय 20, सर्व रा.उंब्रज, ता.कऱ्हाड) या टोळीवर खंडणी, गर्दी-मारामारीचे गुन्हे आहेत. त्यांच्याविरूद्ध  सहायक पोलिस निरीक्षक ए. एल. गोरड यांनी प्रस्ताव पाठविला होता. त्यांना एक वर्षासाठी
हद्दपार करण्यात आले आहे. 

शाहुपूरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनिल सुरेश धांडे (वय 21, रा.मोळाचा ओढा परिसर), शुभम उर्फ सोन्या संभाजी जाधव (वय 24, रा.जाधव चाळ, सैदापूर) या टोळीवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी व मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना तडीपार करण्याबाबत तत्कालीन पोलिस निरीक्षक एम. बी. पाटील यांनी प्रस्ताव पाठविला होता. दोघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राहुल रमेश गुजर (वय27, रा.गोळीबार मैदान), शंभो जगन्नाथ भोसले (वय 21, रा.भोसले कॉलनी, कोडोली) यांच्यावर शासकीय नोकरास मारहाण, वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना तडीपार करण्याबाबत तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी प्रस्ताव पाठविला होता. दोघांनाही एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

पुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिपक नामदेव मसुगडे (वय 22), नामदेव बबन मसुगडे (वय 22), नवनाथ अशोक जाधव (वय 20) व दत्तात्रय दादासाहेब मसुगडे (सर्व रा. रणसिंगवाडी, ता.खटाव) यांच्यावर जबरी चोरी, घरफोडी, चोरी व खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना तडीपार करण्याबाबत सहायक पोलिस निरीक्षक व्ही. बी. घोडके यांनी प्रस्ताव पाठविला होता. या सर्वांना एक वर्षासाठी माण,
खटाव, कोरेगाव, फलटण तालुक्‍यातून हद्दपार करण्यात आले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख