सातारच्या एसपींची मोठी कारवाई; उंब्रज परिसरातील सातजणांना केले तडीपार

या दोन टोळीतील सर्वांनाच हद्दपार करण्याबाबत जनतेमधुन मागणी होत होती. प्रस्तावित दोन्ही टोळीमधील सात जणांना हद्दपार करावे, अशी मागणी उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते.
Satara SP Ajaykumar Bansal
Satara SP Ajaykumar Bansal

सातारा : उंब्रज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीर कारवाया करणाऱ्या दोन टोळयांतील सात जणांना साताऱ्याचे एसपी अजयकुमार बन्सल
यांनी आज तडीपार केले आहे. जिल्हयात अशा प्रकारे दहशत पसरविणा-या व समाजात बेकायदेशीर कारवाया करणाऱ्या टोळयांच्या विरूध्द तडीपारची कारवाई सुरुच राहणार असल्याचे एसपी अजयकुमार बन्सल यांनी सांगितले आहे. 

उंब्रज व पाटण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, मोठी दुखापत, दरोडा, गर्दी मारामारी करणारे टोळीचा प्रमुख संदीप भानुदास भिंताडे (वय २५, रा. जाळगेवाडी, ता. पाटण), सागर उर्फ बंडा शंकर गायकवाड (वय २७, रा. उंब्रज,ता.कराड), सोन्या उर्फ शाहिद शब्बीर मुल्ला (वय २२, रा. उंब्रज),  रोशन उर्फ रोशा अरविंद सोनावले (वय २१, रा. उंब्रज) यांची टोळी तयार झाली होती.

या टोळीने अनेक गुन्हे केल्याने यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्यांचे कारमाने सुरूच होते. यापूर्वी २०१९ मध्ये त्यांना सहा महिने सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले होते. पण हद्दपारीचा कालावधी संपताच त्यांनी
पुन्हा दोन गंभीर गुन्हे करुन समाजात दहशत, भितीचे वातावरण निर्माण केले होते.  या टोळीतील चार जणांना सातारा तसेच सांगली जिल्ह्यातील कडेगांव, वाळवा,  शिराळा तालुक्यातुन एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले होते.

तसेच उंब्रज पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, खंडणी, विनयभंग, दुखापत मारामारी, शिवीगाळ, दमदाटी, करणाऱ्या टोळीचा प्रमुख रणजित नथुराम सरगर (वय २३, रा. वाघेश्वर, ता.कराड) अक्षयउर्फ आप्पा अंकुश लोखंडे (वय  २४, रा. संजयनगर मसुर, ता.कराड), धीरज रघुनाथ जाधव (वय ३०), रा. वाघेश्वर, मसुर, ता.कराड) यांना सुधारण्याची संधी देऊन तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही.

सर्वसामान्य जनतेस त्यांचा उपद्रव सुरूच होता. या दोन टोळीतील सर्वांनाच हद्दपार करण्याबाबत जनतेमधुन मागणी होत होती. प्रस्तावित दोन्ही टोळीमधील सात जणांना हद्दपार करावे, अशी मागणी उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते.

त्यावर चौकशी व सुनावणी होऊन दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकुण पोलिस अधीक्षकांनी या दोन टोळ्यातील सात जणांना तडीपार केले आहे. या सुनावणीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहाय्यक पोलिस फौजदार मधुकर गुरव यांनी पुरावे सादर केले होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com