आषाढीची महापूजा उद्धव ठाकरेंच्या हस्तेच; दर्शनासाठी मंदिर खुले करण्याची मागणी - Mahapuja of Ashadi at the hands of Uddhav Thackeray; Demand to open the temple for darshan | Politics Marathi News - Sarkarnama

आषाढीची महापूजा उद्धव ठाकरेंच्या हस्तेच; दर्शनासाठी मंदिर खुले करण्याची मागणी

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 3 जून 2021

शासनाने परवानगी दिली तर मंदिर भाविकांसाठी 24 तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय ही या बैठकीत घेण्यात आल्याचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. यात्रा काळात शासनाने मंदिर दर्शनासाठी खुले करण्यास परवानगी दिल्यास प्रतिपदा ते पोर्णिमेपर्यंत मंदिर दर्शनासाठी 24 तास सुरु ठेवण्यात येईल, अशी माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज दिली. Mahapuja of Ashadi at the hands of Uddhav Thackeray; Demand to open the temple for darshan

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीची आज येथील भक्त निवास मध्ये
कोरोनाचे सर्व नियम पाळून बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आषाढी यात्रे संदर्भात घेण्यात आलेल्या विविध निर्णयाची माहिती दिली. यावेळी औसेकर महाराज म्हणाले की,  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रेबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. तरीही आषाढी यात्रेच्या निमित्ताने येणारे भाविक व महाराज मंडळींच्या दर्शनासाची  सोय मंदिर समितीच्या वतीने केली जाणार आहे. 

हेही वाचा : डिसले गुरुजींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा : जागतिक बँकेच्या सल्लागारपदी निवड

येत्या 20 जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा आहे. प्रथा परंपरेनुसार आषाढी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे प्रमुख म्हणून  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. यावर्षीही विठ्ठल रुक्मिणी मातेच्या आषाढी महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रितसर निमंत्रण देण्यात येणार आहे. त्यांची प्रत्यक्ष भेट घेवून महापूजेसाठी  पंढरपुराला यावे अशी विनंती देखील केली जाणार आहे. 

आवश्य वाचा : अरे बापरे..पोलिसानेच केले अडीच किलो सोने लंपास..

आषाढी एकादशीच्या दिवशी मनाच्या 18 पालखी प्रमुखांना देवाला नैवद्य
दाखविण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय वारकरी, फडकरी, दिंडीकरी, विणेकरी अशा 195 प्रमुख वारकऱ्यांना आषाढीच्या दिवशी दर्शनाची सोय केली जाणार आहे. या शिवाय विविध संताच्या पादुका आणि देव यांच्या भेटीची परंपरा या वर्षीही कायम ठेवण्यात येणार आहे. 12 जुलै रोजी देवाचा पलंग काढण्यात येणार आहे.

त्यानंतर शासनाने परवानगी दिली तर मंदिर भाविकांसाठी 24 तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय ही या बैठकीत घेण्यात आल्याचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. बैठकीला मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, शाधना भोसले, मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी 
विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते. तर अन्य सदस्य व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख