कृष्णाची रणधुमाळी : १९ मेपासून निवडणूक घेण्याचा उपनिबंधकांचा प्रस्ताव - Krishna's Election : Deputy Registrar's proposal to hold elections from May 19 | Politics Marathi News - Sarkarnama

कृष्णाची रणधुमाळी : १९ मेपासून निवडणूक घेण्याचा उपनिबंधकांचा प्रस्ताव

सचिन शिंदे
शनिवार, 15 मे 2021

अंतिम याद्या प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसानंतर व 20 दिवसाच्या आत निवडणुक कार्यक्रम जाहीर होतो. त्यामुळे 19 मेपासून बिगूल वाजण्याची शक्‍यता आहे. कृष्णाचे निवडणुक निर्णय अधिकारी आष्टेकर यांनीही 19 मेपासून कृष्णाच्या निवडणुका घ्याव्यात,असा प्रस्ताव निवडणुक प्राधीकरणाकडे दिला आहे.

कऱ्हाड : शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या (Kirshna Sugar Factory) पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल 19 मे रोजी वाजण्याची शक्‍यता आहे. कारखान्याचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर (Prakash Ashtekar) यांनी प्राधिकरणाला दिलेल्या प्रस्तावात त्या तारखेपासून निवडणूक कार्यक्रम (Election Declaration) जाहीर करण्याची मागणी केली आहे. 19 मेपासून कार्यक्रम जाहीर झाल्यास मतदान 26, तर 28 जूनला मतमोजणीही होण्याची शक्‍यता आहे.  (Krishna's Election : Deputy Registrar's proposal to hold elections from May 19)

निवडणूक निर्णय प्राधिकरणाने अद्याप त्यावर निर्णय दिलेला नाही. उद्या (सोमवार) पर्यंत निवडणुकीच्या तारखांचे चित्र स्पष्ट होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी आष्टेकर यांनी स्पष्ट केले. कृष्णा कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक अष्टेकर यांची नियुक्ती झाली आहे. कऱ्हाडचे उपनिबंधक मनोहर माळी, कोरेगावचे संजय सुद्रीक व महाबळेश्वरचे जे. पी. शिंदे सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून त्यांच्यासोबत काम पाहणार आहेत.

हेही वाचा : ग्लोबल टेंडर काढूनही भारताला लस मिळणार नाही; केंद्राच्या तज्ञ गटाच्या अध्यक्षांचे स्पष्टीकरण

जिल्हा निबंधक अष्टेकर यांनी 19 मेपासून कृष्णाच्या निवडणुक प्रक्रीया सुरू करण्याचा प्रस्ताव निवडणुक प्राधीकरणाकडे दिला आहे. त्यामुळे चार दिवसात "कृष्णा'च्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याची शक्‍यता आहे. सातारा व सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांचे कार्यक्षेत्रातील कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या पक्‍क्‍या याद्या मेच्या पहिल्या आठवड्यात झाल्या. त्यात 47 हजार 160 सभासदांची अंतीम यादी जाहीर झाली.

आवश्य वाचा : कोरोनाचा भारतीय प्रकार अधिक जीवघेणा अन् त्यावरील लशीचा परिणामही अनिश्चित : डब्लूएचओ

अक्रियाशिल 820 सभासदांचा यादीत समावेश झाला आहे. कऱ्हाड व वाळवा तालुक्‍यात सर्वाधिक सभासद आहेत. त्यामुळे कृष्णाच्या निवडणुकीचा कार्यक्रम येत्या चार दिवसात जाहीर होण्याची शक्‍यता आहे. अंतिम याद्या प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसानंतर व 20 दिवसाच्या आत निवडणुक कार्यक्रम जाहीर होतो. त्यामुळे 19 मेपासून बिगूल वाजण्याची शक्‍यता आहे. कृष्णाचे निवडणुक निर्णय अधिकारी आष्टेकर यांनीही 19 मेपासून कृष्णाच्या निवडणुका घ्याव्यात,असा प्रस्ताव निवडणुक प्राधीकरणाकडे दिला आहे.

श्री. अष्टेकर म्हणाले," कृष्णा कारखान्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीरकरण्याची मागणी केली आहे. त्या दृष्टीने प्राधीकरणाकडून 19 मेपासून कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षीत आहे. त्यानुसार कार्यक्रम जाहीर झाल्यास मतदान 26 तर 28 जूनला मतमोजणी होईल. त्यादृष्टीने आम्ही तयारी केली आहे. प्राधीकरणाने त्यावरही काहीही कळवले नाही. सोमवारपर्यंत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता आहे.'' 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख