कृष्णा कारखान्यासाठी चुरशीने ३५ टक्के मतदान - for Krishna Sugar factory election today voting | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

कृष्णा कारखान्यासाठी चुरशीने ३५ टक्के मतदान

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 29 जून 2021

कृष्णा काठावरील गावागावातील मतदारात उत्साह होता. रेठरे बुद्रूक, रेठरे खुर्द, वाठार, काले, वडगांव हवेली, कार्वे, कोडोली भागात उत्साह जाणवत होता. कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती.

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी आज शांततेत मतदान प्रकिया सुरू असून सकाळी अकरा वाजेपर्यंत १४८ मतदान केंद्रांवर सरासरी ३५ टक्के मतदान झाले होते. सकाळी सर्व निवडणूक लढणाऱ्या तीनही पॅनेलच्या प्रमुखांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले, अविनाश मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते यांचा समावेश आहे. for Krishna Sugar factory election today voting  

कोविडच्या पार्श्वभूमीवर होणारी कृष्णा कारखान्याची निवडणुकही चुरशीची होत आहे. २१ जागांसाठी ६६ उमेदवार रिंगणात आहेत. ४७ हजार १६० मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अनपेक्षितपणे चुरशीची झाल्याने निवडणुकीत रंग आला आहे. सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली.

हेही वाचा : मनसे नेते बाळा नांदगावकरांच्या फेसबूक अंकाऊंटवरून पैसे मागितले!

कृष्णा काठावरील गावागावातील मतदारात उत्साह होता. रेठरे बुद्रूक, रेठरे खुर्द, वाठार, काले, वडगांव हवेली, कार्वे, कोडोली भागात उत्साह जाणवत होता. कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. मात्र, पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या निर्बंधामुळे त्यांच्या उत्साहावर निर्बंध आल्याचे दिसत होते. मतदान केंद्रावर मोबाईल बंदी होती. अनेकांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले होते. अधिकृत ओळखपत्राशिवाय मतदानही करून दिले जात नव्हते. 

आवश्य वाचा : धक्कादायक : पंचायत समिती सभापतीने केला RTI कार्यकर्त्यावर गोळीबार

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख