कृष्णा कारखान्यात भाजपला रोखण्यासाठी दोन मोहित्यांच्या एकत्रिकरणाचा प्रयाेग - In Krishna factory, there will be an attempt to unite the two Mohits to stop the BJP | Politics Marathi News - Sarkarnama

कृष्णा कारखान्यात भाजपला रोखण्यासाठी दोन मोहित्यांच्या एकत्रिकरणाचा प्रयाेग

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 मार्च 2021

दोन्ही पक्षातही खलबते सुरू आहेत. काँग्रेस त्यात आघाडीवर आहे. काही कार्यकर्त्यांनी शनिवारी आमदार चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर काल सायंकाळी कल जाणून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्याला आमदार चव्हाण, ॲड. पाटील-उंडाळकर उपस्थित होते. 

कऱ्हाड : सहकाराला मारक असलेली भाजपसारखी प्रवृत्ती रेठरे बुद्रुक येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यातून बाजूला ठेवण्यासाठी दोन्ही मोहित्यांना एकत्रित करून एकच पॅनेल करावे. राज्यात महाविकास आघाडीप्रमाणे कृष्णा कारखाना निवडणुकीतही एकच पॅनेल असावे, असा आग्रह काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरला.

माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, ॲड. उदयसिंह पाटील यांनी एकत्रित बैठक घेऊन कृष्णा कारखान्याबाबत पक्षातील कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेतले. त्या वेळी पक्षातील पहिल्या, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी एकाच पॅनेलचा आग्रह धरला. कृष्णा कारखाना निवडणूक पक्षासाठी महत्त्वाची आहे. त्या निमित्ताने चाचपणी सुरू आहे. अविनाश मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या एकत्रीकरणासाठी दोन्ही पक्षातून प्रयत्न सुरू आहेत.

दोन्ही पक्षातही खलबते सुरू आहेत. काँग्रेस त्यात आघाडीवर आहे. काही कार्यकर्त्यांनी शनिवारी आमदार चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर काल सायंकाळी कल जाणून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्याला आमदार चव्हाण, ॲड. पाटील-उंडाळकर उपस्थित होते. 

राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. त्याच धर्तीवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे एकच पॅनेल कृष्णा कारखान्यात स्थापन करून थेट लढा द्यावा, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. एकच पॅनेल स्थापन झाल्यास भाजप विरुद्धची लढत अधिक सोपी होईल, असेही मत अनेकांनी मांडले. बैठकीला नानासाहेब पाटील, शिवाजी मोहिते. शिवराज मोरे, नितीन पाटील, प्रा. धनाजी काटकर, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, राजेंद्र चव्हाण, दिग्विजय सूर्यवंशी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख