कृष्णा कारखाना निवडणूक : उंडाळकर गटाचा अविनाश मोहितेंच्या पॅनेलला पाठींबा - Krishna factory election: Undalkar group backs Avinash Mohite's panel | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

कृष्णा कारखाना निवडणूक : उंडाळकर गटाचा अविनाश मोहितेंच्या पॅनेलला पाठींबा

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 16 जून 2021

सर्व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर ॲड. पाटील यांनी पक्षातील वरिष्ठ नेते, जेष्ठ कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेवु असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे ऍड पाटील यांनी पक्षातील नेते व गटाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांशी कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करून अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलला जाहीर पाठींबा दिला आहे.

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत युवानेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर Udaysinh Patil Undalkar यांनी कॉग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रहानुसार अविनाश मोहिते Avinash Mohite यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलला पाठिंबा जाहीर केला आहे. अॅड. उंडाळकरांनी कार्यकर्त्यांना तशा सुचना दिल्या आहेत. त्यामुळे संस्थापक पॅनेलची ताकद वाढणार आहे. Krishna factory election: Undalkar group backs Avinash Mohite's panel

कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत अविनाश मोहिते, डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या गटाच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरु होत्या. त्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, ॲड. उदयसिंह पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनी प्रयत्नही केले. मात्र दोन्ही नेत्यांचे एकमत झाले नाही. त्यामुळे उंडाळकर गटाचा पर्यायाने काँग्रेसचे पाठिंबा कोणाला द्यायचा यासाठी युवानेते ॲड. पाटील यांच्या उपस्थितीत कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक झाली. 

हेही वाचा : ...तर पुण्यात पुन्हा कडक निर्बंध; अजित पवार

त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी संस्थापक पॅनेलला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. सर्व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर ॲड. पाटील यांनी पक्षातील वरिष्ठ नेते, जेष्ठ कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेवु असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे ऍड पाटील यांनी पक्षातील नेते व गटाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांशी कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करून अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलला जाहीर पाठींबा दिला आहे. या निर्णयामुळे उंडाळकर समर्थकासह अनेक कॉग्रेस कार्यकर्ते संस्थापक पॅनेलच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. पाठींब्याचा या निर्णयामुळे संस्थापक पॅनेलला अधिक बळकटी मिळणार आहे.

काकांच्या पश्च्यात पहिलीच निवडणूक 

माजी सहकार मंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या पश्च्यात ही पहिलीच निवडणूक होत आहे. या निवडणुकीत उंडाळकर समर्थकांसह कॉग्रेस कार्यकर्त्यांचा पाठिंबा कोणाला मिळणार याची उत्सुकता लागली होती. त्यांनी अविनाश मोहिते यांना पाठिंबा दिला हे. त्यामुळे संस्थापक पॅनेलची ताकद वाढणार आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख