लाचप्रकरणी कोरेगावचे सहायक फौजदार जाळ्यात... - Koregaon assistant police sub-inspector caught in bribery case ... | Politics Marathi News - Sarkarnama

लाचप्रकरणी कोरेगावचे सहायक फौजदार जाळ्यात...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 6 मार्च 2021

तक्रारदाराच्या भावावर गुटख्याचा गुन्हा दाखल असून त्यात मदत करतो, जामिनावर सोडण्यास मदत करतो, यासाठी पाटोळे याने 20 हजारांच्या लाचेची मागणी केली. या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल (ता. पाच) पडताळणी केली.

कोरेगाव : कोरेगाव पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुटख्याच्या गुन्ह्यात मदत करतो. जामीनावर सोडण्यास मदत करतो, असे सांगून 20 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना सहायक पोलिस उपनिरीक्षकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले. 

प्रल्हाद श्रीरंग पाटोळे असे या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदाराच्या भावावर गुटख्याचा गुन्हा दाखल असून त्यात मदत करतो, जामिनावर सोडण्यास मदत करतो, यासाठी पाटोळे याने 20 हजारांच्या लाचेची मागणी केली. या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल (ता. पाच) पडताळणी केली.

त्यानंतर आज (शनिवार) 20 हजारांची लाच स्वीकारताना सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद पाटोळे यास रंगेहाथ पकडले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आरिफा मुल्ला व अविनाश जगताप, पोलिस नाईक राजे, ताटे, खरात यांच्या पथकाने कोरेगाव येथे सापळा रचून ही कारवाई केली. पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आरिफा मुल्ला तपास करत आहेत.
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख