कऱ्हाडला जम्बो कोविड सेंटर उभारणार : पृथ्वीराज चव्हाण  - IN Karad to set up Jumbo Covid Center: Prithviraj Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

कऱ्हाडला जम्बो कोविड सेंटर उभारणार : पृथ्वीराज चव्हाण 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 8 जून 2021

सातारा येथील जम्बो कोविड सेंटरप्रमाणेच कऱ्हाडलाही जम्बो कोविड सेंटर करण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यादृष्टीने काम सुरू आहे.''  श्री. चव्हाण म्हणाले, ''तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका आहे. त्यामुळे ती गोष्ट लक्षात घेऊन लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

कऱ्हाड : साताऱ्यासारखेच कऱ्हाडलाही जम्बो कोविड सेंटर Jambo Covid center उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारकडून हवी ती मदत आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी दिली. शासकीय रुग्णालयात जिल्हास्तरावर रुग्णालय व्यवस्थापकपद निर्माण करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. IN Karad to set up Jumbo Covid Center: Prithviraj Chavan

श्री. चव्हाण म्हणाले, ''कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. त्यासाठी तज्‍ज्ञांनी इशारा दिला आहे. जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी कमी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने शिथिलता आणली आहे. त्यामुळे काही प्रमाणात अत्यावश्यक सेवा सुरू होत आहेत. तरीही नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात आमदार फंडातून प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपजिल्हा रुग्णालयाला सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्याकडून यादी मागवली आहे. 

हेही वाचा : आजच्याच दिवशी स्थापन झाली होती मराठवाड्यातली शिवसेनेची पहिली शाखा..

शासनाने आमदार फंडातून एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याहीपेक्षा जास्त खर्चाची तयारी आहे. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या सुविधा देण्याचे नियोजन केले आहे. सातारा येथील जम्बो कोविड सेंटरप्रमाणेच कऱ्हाडलाही जम्बो कोविड सेंटर करण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यादृष्टीने काम सुरू आहे.''  श्री. चव्हाण म्हणाले, ''तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका आहे. त्यामुळे ती गोष्ट लक्षात घेऊन लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

आवश्य वाचा : डीएनए चाचणी करून मृतदेहांची ओळख पटवणार : गृहमंत्री वळसे पाटील

बालरोगतज्‍ज्ञांशी संवादही साधला आहे. कोविडमुळे निर्माण झालेला गोंधळ लक्षात घेता शासकीय रुग्णालयात जिल्हास्तरावर रुग्णालय व्यवस्थापकपद असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याची गरज लक्षात घेऊन ते पद निर्माण करावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक जिल्हा रुग्णालयात असे पद असलेच पाहिजे.''

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख