वाई मतदारसंघातील जलसिंचनाचा प्रश्न सुटणार; मकरंद पाटलांनी दिला दहा कोटींचा निधी

वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील शंभर हेक्टरपेक्षा कमी क्षमतेचे क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी परिसरातील विहीरी, कूपनलिका यांचा जलसाठा उंचावणे आवश्यक असल्याने संबंधित गावातील ओढयांवर सिमेंट काँक्रीट बंधारे, पाणी साठवण बंधारे बांधणे आवश्यक होते.
Irrigation issue in Wai constituency will be resolved; Makrand Patil gave a fund of ten crores
Irrigation issue in Wai constituency will be resolved; Makrand Patil gave a fund of ten crores

 वाई : शेती समृद्ध करण्यासाठी जलसिंचनाच्या योजना सुरळीत चालणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीच्या परिसरात जलसंचय मोठया प्रमाणात होणे गरजेचे आहे. वाई - खंडाळा - महाबळेश्वर मतदारसंघातील विविध गावात जलसंधारणाची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी 46 सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यासाठी सुमारे 10 कोटी 8 लाख 43 हजार रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे शेती सिंचनाच्या योजनांना विशेष फायदा होणार आहे. 

वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील शंभर हेक्टरपेक्षा कमी क्षमतेचे क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी परिसरातील विहीरी, कूपनलिका यांचा जलसाठा उंचावणे आवश्यक असल्याने संबंधित गावातील ओढयांवर सिमेंट काँक्रीट बंधारे, पाणी साठवण बंधारे बांधणे आवश्यक होते.

तीनही तालुक्यातील स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांची मागणी असल्याने आमदार मकरंद पाटील यांनी विशेष प्रयत्न करून महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून 46 नवीन बंधार्‍यांच्या बांधकामा साठी दहा कोटीचा विशेष निधी मंजूर करुन घेतला आहे. यामुळे जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे. 

वाई मतदारसंघातील गावोगावी शेती सिंचन सुरळीत होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने जलसंचयन होणे गरजेचे होते. लोकांच्या मागणीनुसार ही कामे पूर्ण होऊन त्याचा वापर सुरू होईल. शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी यापुढेही अनेक योजना राबविणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.  

मंजूर गावांची नावे व उपलब्ध निधीची रक्कम लाखात खालीलप्रमाणे:- वाई तालुक्यातील सुरुर क्र.2 (27 .01), कोचळेवाडी( मयुरेश्वर) क्र.1 (24 .01 ) , कोचळेवाडी क्र .2 ( 26 .70 ) , गुळुब (34 .74 ), चांदक ( 23 .84 ) , लगडवाडी (23 .80 ), मापरवाडी ( 23 .84 ), वाकणवाडी ( 21 .83 ) , भुईंज क्र.1 ( 27 .06 ), भुईंज क्र.2 ( 24 .99 ), पाचवड क्र.1 (26 .78), मांढरदेव क्र .1 (27 .10), मांढरदेव क्र.2 ( 22 .36 )

बोपेगाव (23 .32 ) , किकली ( 18 .46 ) , वरचे चाहूर(भुईज) ( 32 .53 ) , वेळे क्र .1 ( 27 .21 ) , वेळे क्र .2 ( 27 .21 ) , बदेवाडी ( 26 .77 ) , वयगाव क्र .1 ( 23 .23 ) , वयगाव क्र . 2 ( 22 .18 ) , बावधन ( 20 .55 ) , बोरगाव बुद्रुक ( 22 .29 ) , गुंडेवाडी क्र .1 ( 17 .77 ) , गुंडेवाडी क्र .2 ( 20 .32 ) तसेच खंडाळा तालुक्यातील असवली क्र .2 ( 17 .06 ) , लोणंद (27.57), कवठे क्र .2 ( 22 .39 ), धावडवाडी क्र.1 ( 22 .21 )

धावडवाडी क्र.2 ( 23 .69 ), भादे ( 22 .30 ), अंदोरी (24 .79), नायगाव ( 23 .98), कवठे क्र.1 (22 .07), असवली क्र .1 (23 .97), बोरी ( 22 .23 ), खेड बुद्रुक ( 26 .18 ), शिरवळ (25 .19), जवळे (23 .58), बावडा ( 20 .18 ), पाडळी (21 .90 ) तसेच महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड क्र .1 (26 .52), मेटगुताड क्र .2 ( 25 .66 ), मेटगुताड क्र.3 ( 27 .59 ) , भिलार ( 22 .09 ), धारदेव ( 21 .38 ) अशा एकूण 46 बंधाऱ्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com