खासदार निंबाळकरांनी पवारांविषयी नरेंद्र मोदींना हे सांगितले... - I have been elected from Pawar's constituency ... Nimbalkar reminded Modi ... | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार निंबाळकरांनी पवारांविषयी नरेंद्र मोदींना हे सांगितले...

किरण बोळे
गुरुवार, 11 मार्च 2021

फलटण-पंढरपूर लोहमार्गाच्या कामासाठी केंद्राकडून निधी देण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर व ॲड. जिजामाला नाईक- निंबाळकर यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांची प्रतिमा भेट दिली. 

फलटण शहर : माढाचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी आपली पत्नी व जिल्हा परिषद सदस्या ॲड. जिजामाला नाईक- निंबाळकर यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली. त्या वेळी त्यांनी मी पवारांच्या मतदारसंघातून निवडून आलोय, असे सांगून मतदारसंघातील रखडलेले प्रश्न व प्रकल्पांबाबतची माहिती पंतप्रधानांना दिली. या मतदारसंघात रोजगारासाठी मोठा प्रकल्प यावा यासह रखडलेले प्रश्न व प्रकल्प सकारात्मक भूमिकेतून मार्गी लागतील, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी श्री. निंबाळकर यांना दिले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर व ॲड. जिजामाला नाईक- निंबाळकर यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांची प्रतिमा भेट दिली. खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी पत्नी व जिल्हा परिषद सदस्या ॲड. जिजामाला नाईक- निंबाळकर यांच्यासमवेत पंतप्रधानांची पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली.

त्या वेळी त्यांनी मतदारसंघातील रखडलेले प्रश्न व प्रकल्पांबाबतची माहिती पंतप्रधानांना दिली. नीरा- देवघर धरणाचे काम पूर्णत्वास गेले असले, तरी कालव्याची कामे प्रलंबित आहेत. या कामासाठी एक हजार कोटींच्या निधीची गरज आहे. हे काम पूर्ण झाल्यास फलटणसह खंडाळा, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 

या मतदारसंघाचे नेतृत्व या पूर्वी माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले आहे. सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी जाणीवपूर्वक सोडविला नाही. नीरा- देवघरच्या कालव्यांची कामेही जाणीवपूर्वक रखडवून हे पाणी बारामतीकडे वळविल्याचेही त्यांनी मोदी यांच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकल्पासाठी केंद्रातून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

माण- खटावमधील गुरुवर्य (कै.) लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे- कटापूर) केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत राबविली जात आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 1061.34 कोटी खर्च अपेक्षित आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतून 100 टक्के निधी मिळावा, अशीही मागणी रणजितसिंह यांनी केली.

फलटण-पंढरपूर लोहमार्गाच्या कामासाठी केंद्राकडून निधी देण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर व ॲड. जिजामाला नाईक- निंबाळकर यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांची प्रतिमा भेट दिली. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख