होलार समाजाच्या समस्या प्राधान्याने सोडविणार : मंत्री धनंजय मुंडे 

सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांमध्ये सर्वांना समन्याय देण्यात यावा अशा सक्त सूचना बैठकीत श्री. मुंडे यांनी केल्या.
Holar will solve community problems with priority: Minister Dhananjay Munde
Holar will solve community problems with priority: Minister Dhananjay Munde

मुंबई : होलार Holar Community समाजाच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यास करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल तसेच होलार समाजाने केलेल्या विविध मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय तातडीने घेवून या समाजातील विविध प्रश्न सोडविण्याची ग्वाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे Minister Dhananjay Munde यांनी बैठकीत दिली. Holar will solve community problems with priority: Minister Dhananjay Munde

 मंत्रालयात राज्यातील होलार समाजाच्या विविध प्रश्नांबाबत बैठक झाली. या बैठकीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधानसचिव श्याम तागडे, बार्टीचे महासंचालक डॉ. धम्मज्योति गजभिये, आयुक्त डॉ. प्रशांत नारनरवरे, समाजकल्याण विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, होलार समाजाचे प्रतिनिधी राजाराम देवळे, मानिकराव भंडगे यासह सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. मुंडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागातंर्गत उच्चस्तरीय समिती नेमून होलार समाजाच्या जातीच्या वर्गवारी संदर्भात सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल. होलार समाजासंदर्भात बार्टीने नव्याने या जातींचा अभ्यास करावा. जातीच्या नोंदी जेंव्हा नव्याने केल्या जातील तेंव्हा त्या अगदी काटेकोरपणे करण्यावर भर द्यावा. या समाजाने महामानवाच्या यादीसाठी जी नावे सुचविली आहेत ती शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार त्यांचा यामध्ये समावेश करण्यात यावा.

'स्टँड अप' योजना तसेच सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून या समाजातील जास्तीत जास्त उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी नव्याने धोरण करत असून ते
लवकरच जाहीर करणार असल्याचेही श्री.मुंडे यांनी सांगितले. श्री. मुंडे म्हणाले, दादासाहेब सबलीकरण योजना राबविताना ज्या लाभार्थ्यांसाठी ही योजना आहे. त्यांना समन्यायी वाटप करावे याबाबत सामाजिक न्याय विभागाने सर्व जिल्हाधिकारी व समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त यांना पत्राव्दारे कळवावे.

सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांमध्ये सर्वांना समन्याय देण्यात यावा अशा सक्त सूचना बैठकीत श्री. मुंडे यांनी केल्या. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधानसचिव श्याम तागडे यांनी  होलार समाजासंदर्भात सद:स्थितीत  सुरू असलेली कार्यवाहीची सविस्तर माहिती बैठकीत दिली. होलार समाजाचे प्रतिनिधी राजाराम देवळे, यांनी यावेळी होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी अनेक सुचना मांडल्या. या समाजाच्या अभ्यासासाठी स्वतंत्र आयोग नेमावा, अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अ,ब,क,ड वर्गवारी करून होलार समाजाला ठराविक आरक्षण मिळावे,

होलार समाजाची स्थानिक चौकशी करून त्या आधारावर जात पडताळणी मिळावी, होलार समाजाती वाजंत्री कलाकांरासाठी अनुदानाची शिफारस, मागासवर्गीय विद्यार्थ्यी वसतीगृहात होलार समाजातील विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात यावा. होलार समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे, राज्यस्तरावरील समितीमध्ये या समाजाचा प्रतिनिधी नेमणे, या समाजात उद्योजक तयार व्हावेत यासाठी शासनाकडून नव्याने योजना देण्यात याव्यात अशा विविध सुचना या बैठकीत होलार समाजाच्या प्रतिनिधींनी मांडल्या.                       

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com