हसन मुश्रीफांची कामाची वेगळी पध्दत; त्यांना कोणीही कधीही भेटू शकतो... - Hassan Mushrif's different approach to work; Anyone can meet them anytime ... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

हसन मुश्रीफांची कामाची वेगळी पध्दत; त्यांना कोणीही कधीही भेटू शकतो...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 23 जून 2021

सात सप्टेंबरला सातारा नगरपालिकेची हद्दवाढ करण्यात आलेली आहे. नव्याने हद्दीत समाविष्ट झालेल्या भागाचा १५ व्या वित्त आयोगाचा निधी सक्षम प्राधिकरण म्हणून सातारा पालिकेकडे वाढीव भागाच्या विकासाकरीता वर्ग करणे आवश्यक आहे.

सातारा : मंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे असून त्यांची कामाची एक वेगळी शैली आहे. त्यांना आम्हीच काय कोणीही कधीही भेटू शकतो. त्यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधामुळेच आम्ही त्यांना भेटलो. हद्दवाढीनंतर सातारा पालिकेत समाविष्ट झालेल्या क्षेत्राची जिल्हा परिषदेकडे जमा झालेली १५ व्या वित्त आयोगाची रक्कम सातारा पालिकेकडे वर्ग करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले MP Udayanraje Bhosle यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे.  Hassan Mushrif's different approach to work; Anyone can meet them anytime ...

सातारा नगरपालिकेची सुमारे सात महिन्यांपूर्वी हद्दवाढ झाली आहे. हद्दवाढ होण्यापूर्वीच्या बाहेरील  ग्रामीण नागरी क्षेत्राकरीता लोकसंख्येनुसार १५ व्या वित्त आयोगाची रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात  आलेली आहे. याबाबतची सुमारे दोन कोटी ९२ लाख ६७ हजार १७० रूपयांची रक्कम हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासाकरीता सातारा पालिकेकडे वर्ग करावी, अशी 
मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाव्दारे समक्ष भेटुन केली. 

हेही वाचा : पवारांनी उद्धघाटन केलेल्या योजनेला उद्धव ठाकरेंची स्थगिती, महाविकास आघाडीत वाद

मंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे आहेत. त्याची कामाची एक वेगळी शैली आहे. त्यांना आम्हीच काय कोणीही कधीही भेटु शकतो. त्यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधामुळेच आम्ही त्यांना भेटत आहोत, असे 
स्पष्ट करुन उदयनराजेंनी निवेदनात नमुद केले की, २०२०-२१ करीता शासन निर्णयानुसार संबंधित निधीचा पहिला हप्त्याच्या वितरणापोटी
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर अनुक्रमे १०:१०:८० टक्के या प्रमाणात निधी वितरीत करण्यात आलेला आहे.

आवश्य वाचा : शिवसेनेत सुरु झालेत उगवते नेतृत्व संपविण्याचे डाव?

सात सप्टेंबरला सातारा नगरपालिकेची हद्दवाढ करण्यात आलेली आहे. नव्याने हद्दीत समाविष्ट झालेल्या भागाचा १५ व्या वित्त आयोगाचा निधी सक्षम प्राधिकरण म्हणून सातारा पालिकेकडे वाढीव भागाच्या विकासाकरीता वर्ग करणे आवश्यक आहे. सध्या जिल्हा परिषदेकडे हा निधी अखर्चित आहे.  हा निधी नगर परिषदेकडे वर्ग करण्याबाबत जिल्हा परिषदेकडे सुचना केली होती.

त्यावेळी यासंदर्भात ग्रामविकास  खात्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. तरी हा निधी सातारा पालिकेकडे वर्ग करण्याबाबत जिल्हा परिषदेस योग्य त्या सूचना कराव्यात, अशी शिफारस केली आहे.  यावेळी रॉबर्ट मोझेस, काका धुमाळ, जितेंद्र खानविलकर, विनीत पाटील, आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख