सैनिक स्कुलची पालकमंत्र्यांकडून पाहणी, विकास कामांना गती देण्याची केली सूचना - Guardian Minister inspects Sainik School, suggests to speed up development works | Politics Marathi News - Sarkarnama

सैनिक स्कुलची पालकमंत्र्यांकडून पाहणी, विकास कामांना गती देण्याची केली सूचना

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 18 मार्च 2021

 पालकमंत्री यांनी एनडीए ब्लॉक, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, डहाणूकर हॉल, कॅटींन, शाळेच्या मुख्य इमारतीबरोबर सैनिक स्कूलच्या मैदानाची पहाणी केली. त्यावेळी त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.

सातारा : सातारा येथील सैनिक स्कूल कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून उभे राहिले आहे. या सैनिक स्कूलच्या विकास कामांसाठी राज्य शासनाने 300 कोटींची तरतूद केली आहे. या सैनिक स्कूलचा टप्या टप्याने विकास करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री यांनी आज सैनिक स्कूलच्या पाहणी दरम्यान सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजयकुमार मुनगीलवार, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसिलदार आशा होळकर, कार्यकारी अभियंता एस.पी. दराडे, सैनिक स्कूलचे प्राचार्य उज्वल घोरमाडे, उपप्राचार्य बी. लक्ष्मीकांत, प्रशासकीय अधिकारी प्रमोद पाटील, सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी अमर जाधव उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, सैनिक स्कूलची स्थापना 1961 मध्ये झाली. या शाळेचा परिसर 115 एकरचा असून या शाळेत 630 विद्यार्थी शिकत आहे. या सैनिक स्कूलमधील काही इमारती 1932 व 1962 या वर्षातील आहे. त्या आता जुन्या झाल्या आहेत. राज्य शासनाने सैनिक स्कूलच्या विकासासाठी 300 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. या सैनिक स्कूलच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे.

टप्याटप्याने विकासासाठी निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या विकासाच्या कामाला आता गती दयावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या. यावेळी पालकमंत्री यांनी एनडीए ब्लॉक, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, डहाणूकर हॉल, कॅटींन, शाळेच्या मुख्य इमारतीबरोबर सैनिक स्कूलच्या मैदानाची पहाणी केली. त्यावेळी त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख