पालकमंत्र्यांनी हातात रॅकेट घेत शटल उडविले....

जिल्हा वार्षिक योजनेतून या बॅडमिंटन कोर्टसाठी 14 लाख रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीन बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आले आहे.
पालकमंत्र्यांनी हातात रॅकेट घेत शटल उडविले....
The Guardian Minister flew the shuttle with a racket in his hand ....

सातारा : कराड येथील शिवाजी स्टेडियममध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टची सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज पहाणी केली. यावेळी त्यांना बॅडमिंटन खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी हातात रॅकेट घेत नव्या कोर्टवर शटल मारले. एरव्ही शांत राजकारणी म्हणून ख्याती असलेल्या बाळासाहेब पाटीलांना बॅडमिंटन खेळता पाहून अनेकांना धक्का बसला. The Guardian Minister flew the shuttle with a racket in his hand ....

कराड येथील शिवाजी स्टेडियममध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून 14 लाख खर्चून नव्यानं उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टाची पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज पाहणी केली. तसेच चांगल्या प्रकारे काम झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, जिल्हा क्रिडाधिकारी युवराज नाईक, नगरसेवक सौरभ पाटील, जयंत पाटील आदी उपस्थित होते. 

जिल्हा वार्षिक योजनेतून या बॅडमिंटन कोर्टसाठी 14 लाख रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीन बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आले आहे. यापूर्वी कराड येथील बॅडमिंटन खेळाडूंना बाहेर खेळताना अडचणी येत होत्या. आता नव्याने उभारण्यात आलेल्या कोर्टमुळे त्यांना बाहेर सहजपणे खेळता येणार आहे.

या बॅडमिंटन कोर्टमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. नुकतेच शासनाने निर्बंधामध्ये शिथिलता दिली आहे. त्याचबरोबर इनडोअर खेळाला ही परवानगी दिली आहे. याचा बॅडमिंटन खेळाडूना लाभ होणार आहे. यावेळी खेळाडू व त्यांचे पालक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in