निढळला दहा वर्षांनंतर सत्तांतर; माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवींच्या गटाचा पराभव

आमदार महेश शिंदे यांच्या गटाच्या पॅनेलने नऊ जागा जिंकत निढळ ग्रामपंचायतीत तब्बल दहा वर्षानंतर सत्तांतर घडविले. तर चंद्रकांत दळवी यांच्या गटाच्या पॅनेलला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत.
Gram Panchayat Election Result :  Mahesh shinde chandrkanat Dalvi Nidhal Villege
Gram Panchayat Election Result : Mahesh shinde chandrkanat Dalvi Nidhal Villege

दहिवडी (ता. माण) : जिल्ह्यातील बहुतांशी आदर्श गावांत सत्तांतर झाल्याचे चित्र आहे. खटाव तालुक्यातील निढळ हे माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांचे आदर्श गाव आहे. येथील ग्रामपंचायत निवडणूकीत तब्बल दहा वर्षानंतर सत्तांतर झाले. यामध्ये कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या गटाने एकहाती सत्ता मिळविली आहे. चंद्रकात दळवी यांच्या गटाला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत.  

निढळ हे खटाव तालुक्यातील आदर्श गाव असून माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांची विकास कामे झाली आहे. जिल्ह्यातील निढळ हे पहिले आदर्श गाव आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत यावेळेस तब्बल दहा वर्षांनंतर सत्तांतर झाले आहे.

या निवडणूकीत चंद्रकांत दळवी यांच्या गटाच्या पॅनेल विरूध्द कोरेगावचे आमदर महेश शिंदे यांच्या गटाचे जी. डी. खुस्पे यांचे पॅनेल अशी लढत झाली. यामध्ये आमदार महेश शिंदे यांच्या गटाच्या पॅनेलने नऊ जागा जिंकत निढळ ग्रामपंचायतीत तब्बल दहा वर्षानंतर सत्तांतर घडविले. तर चंद्रकांत दळवी यांच्या गटाच्या पॅनेलला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. 

कोथळीत खडसे परिवाराच्या पॅनेलचा शिवसेनेवर विजय

जळगाव, : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या कोथळी ग्रामपंचायत निवडणूकीत ‘खडसे’परिवाराच्या पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या परिवर्तन पॅनलचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत.

राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते ‘कोथळी’ग्रामपंचायत निवडणूकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. एकनाथराव खडसे व त्यांच्या कन्या रोहिणी खडसे  यांनी  भारतीय जनता पक्षातून ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’मध्ये प्रवेश केला, मात्र खडसे यांच्या सून खासदार रक्षा खडसे भारतीय जनता पक्षात आहेत. यावेळी खडसे प्रणित भाजप पॅनल न करता खडसे परिवारात माननाऱ्या उमेदवारांचे पॅनल करण्यात आले होते. त्या विरूध्द शिवसेनेचे जिल्हा प्रमूख व अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे परिवर्तन पॅनल उभे होते. त्यात मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली होती.

कोथळी ग्रामपंचायत निवडणूकीत ११ जागा आहेत. त्या पैकी खडसे परिवाराच्या पॅनलला सहा जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना पुरस्कृत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पॅनलला पाच जागा मिळाल्या आहेत.ॲड.रोहिणी खडसे व भाजप खासदार रक्षा खडसे यांनी सहा उमेदवार खडसे यांना माननाऱ्या गटाचे असल्याचा दावा केला आहे. गेल्या वेळी ‘कोथळी’ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा संरपंच होता, यावेळी खडसे यांच्या परिवाराच्या पॅनलचा सरपंच असेल असा दावा भाजप खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com