गोकुळमध्ये सतेज पाटील कोणाला अध्यक्ष करणार? : या दोघांची नावे चर्चेत! 
In Gokul, who will be the president of Satej Patil? : The names of these two are under discussion!

गोकुळमध्ये सतेज पाटील कोणाला अध्यक्ष करणार? : या दोघांची नावे चर्चेत! 

"गोकुळ'च्या निवडणुकीत पालकमंत्री पाटील यांची भूमिका मोठी आणि महत्त्वपूर्ण ठरल्याने ते विश्‍वास पाटील यांच्यासाठी आग्रही राहण्याची शक्‍यता आहे. पण, विद्यमान संचालक मंडळात हे दोनच अनुभवी असल्याने चर्चा करून याविषयीचा अंतिम निर्णय होईल.

कोल्हापूर : गोकुळमध्ये (Gokul) सत्तांतर घडविलेल्या राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या नवनिर्वाचित संचालकांची पहिली बैठक 14 मे रोजी आहे. याच बैठकीत नव्या अध्यक्षांची निवड होईल. त्यासाठी अक्षयतृतीया आणि ईदचा मुहूर्त साधण्यात येणार आहे. दरम्यान, या आघाडीतून ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे (Arun Dongale) व विश्‍वास पाटील (Vishwas Patil) विजयी झाले आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणाची अध्यक्षपदावर निवड होणार, याविषयी उत्सुकता आहे. डोंगळे यांनी सर्वप्रथम सत्तारूढ गटाला खिंडार पाडल्याने त्यांचीच निवड शक्‍य आहे. (In Gokul, who will be the president of Satej Patil? : The names of these two are under discussion!)

काल (ता. 4) निकाल लागल्यावर आज नेत्यांनी अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व "गोकुळ' प्रशासनाशी चर्चा करून तारीख ठरवली. त्यात 14 मे रोजी संचालकांची पहिली बैठक बोलवून त्यातच अध्यक्ष निवड करण्याचा निर्णय घेतला. संचालकांना या बैठकीची नोटीस देण्याचा सात दिवसांचा कालावधी गृहीत धरता शुक्रवारी (ता. 7) या संदर्भातील अधिकृत घोषणा होण्याची शक्‍यता आहे.

"गोकुळ' मल्टिस्टेट करण्याच्या निर्णयापासूनच डोंगळे सत्तारूढ गटापासून काहीसे लांब गेले आहेत. विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या उमेदवारीवर माजी आमदार महाडिक यांनी टीका केली होती. त्यातून या दोघांत कलगीतुरा रंगला होता. "गोकुळ'च्या आगामी निवडणुकीत आपण सत्ताधाऱ्यांबरोबर नसणार, याची झलक याचवेळी त्यांनी दाखवली होती.

त्यानंतर मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन त्यांच्याच नेतृत्वाखाली यापुढे काम करण्याचे जाहीर केले. त्याचवेळी डोंगळे सत्तारूढ गटातून निसटणार, हे वळपास स्पष्ट झाले होते. कालांतराने त्यावर शिक्कामोर्तबही झाले. त्यामुळे सत्तारूढ गटाविरोधात पहिल्यांदा बंडाचा झेंडा फडकावल्याची
बक्षिसी म्हणून पहिल्या अडीच वर्षंसाठी डोंगळे यांचीच अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्‍यता आहे.

अध्यक्षपदासाठी दुसरे ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटीलही इच्छुक आहेत. त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून सत्तारूढ गटाला सोडचिठ्ठी देत विरोधी आघाडीची कास धरली. "गोकुळ'च्या निवडणुकीत पालकमंत्री पाटील यांची भूमिका मोठी आणि महत्त्वपूर्ण ठरल्याने ते विश्‍वास पाटील यांच्यासाठी आग्रही राहण्याची शक्‍यता आहे. पण, विद्यमान संचालक मंडळात हे दोनच अनुभवी असल्याने चर्चा करून याविषयीचा अंतिम निर्णय होईल.

तूर्त उपाध्यक्षपद नाहीच...

संघात उपाध्यक्षपद निर्माण करण्याचे संकेत मिळत असले, तरी सद्यस्थितीत ते शक्‍य नाही. यासाठी पहिल्यांदा संचालक मंडळात तसा ठराव करून त्याला सर्वसाधारण सभेची मंजुरी घ्यावी लागते. त्यानंतर हा प्रस्ताव सहकार निबंधकांकडे पाठवावा लागतो, त्यांच्या मंजुरीनंतर उपाध्यक्षपद तयार होईल. ही प्रक्रिया दीर्घकाळाची असल्याने पहिल्या बैठकीत केवळ अध्यक्षांचीच निवड होणार आहे. पण, भविष्यात संघात उपाध्यक्षपदही निर्माण केले जाण्याचे संकेत आहेत.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in