उद्योगांना लॉकडाउनमधून शिथिलता द्या; उद्योजकांची उदयनराजेंकडे धाव - Give industries a break from lockdown; Entrepreneurs run to MP Udayanraje | Politics Marathi News - Sarkarnama

उद्योगांना लॉकडाउनमधून शिथिलता द्या; उद्योजकांची उदयनराजेंकडे धाव

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 4 जून 2021

आता संयम आणि धीर सुटत जाण्याची भिती उत्पादक उदयोजकांना वाटत आहे. उत्पादन सुरु नसताना, स्थायी आस्थापना खर्च करावाच लागत आहे. वीजबिल, सुरक्षाखर्च आदी प्राथमिक स्वर्च थांबलेले नाहीत. अशा परिस्थितीत लॉकडाउन, कडक लॉकडाउन, संचारबंदी आदी रोज बदलण्या-या सुचनांची अंमलबजावणी करताना उत्पादक उदयोजक आज मेटाकुटीला आला आहे.

सातारा : सातारच्या दोन्ही औद्योगिक वसाहतीतील उद्योग डबघाईच्या मार्गावर असून कोरोना आकड्यांचा घोळ करत न बसता नियमांच्या अधिन राहून औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी. यासाठी औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची संघटना असलेल्या मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (MASS) पदाधिकाऱ्यांनी आज खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उद्योगांना लॉकडाउनमध्ये शिथिलता (Lockdown Relaxation) देऊन उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे. 

साताराच्या मॅन्युफॅक्चर्स असोशिएशनच्या (मास) प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेवून लॉकडाऊनमुळे येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली. यावेळी साताराच्या मॅन्युफॅक्चर्स असोशिएशनचे अध्यक्ष उदय देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, उद्योजक अमोल कुलकर्णी, परेश सामंत, सचिन सामंत, अमित भालेराव, राहुल शिंदे, स्वप्निल
बराडकर, केदार मुरुडकर, प्रसाद पंडित, प्रमोद पाटील, रणजित घोरपडे, माजी सभापती सुनील काटकर, बाळासाहेब ननावरे, विनित पाटील, शफी इनामदार उपस्थित होते.

हेही वाचा : धक्कादायक : वरिष्ठांच्या छळाला कंटाळून महिला आयएएसचा तडकाफडकी राजीनामा

यावेळी मासच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले की, मासने सामुहिक प्रयत्नामधून वेळोवेळी स्वबळावर किंवा शासनाच्या सहकार्याने अनेक उपक्रम सातारच्या एमआयडीसीच्या विकासासाठी राबविलेले आहेत. मासचे पदाधिकारी-सदस्य हे स्वतः उत्पादक, उद्योजक असल्यामुळे त्यांना दैनंदिन येणा-या समस्यांची चांगली जाण आहे. गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळात खर्च बचत करून, कोरोना हे संकट न समजता, संधी समजुन साताराच्या एमआयडीसी मधील सर्व उदयोगांनी कोरोना काळातील नियम व अटी शर्तींचे पालन करण्याचे प्रयत्न केले आहेत. 

आवश्य वाचा : खासदार अमोल कोल्हेंच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पडले पहिले पाऊल!

तथापि आता संयम आणि धीर सुटत जाण्याची भिती उत्पादक उदयोजकांना वाटत आहे. उत्पादन सुरु नसताना, स्थायी आस्थापना खर्च करावाच लागत आहे. वीजबिल, सुरक्षाखर्च आदी प्राथमिक स्वर्च थांबलेले नाहीत. अशा परिस्थितीत लॉकडाउन, कडक लॉकडाउन, संचारबंदी आदी रोज बदलण्या-या सुचनांची अंमलबजावणी करताना उत्पादक उदयोजक आज मेटाकुटीला आला आहे.

त्यामुळे उदयोगक्षेत्र असलेल्या भागाकरीता, औदयोगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी यांनी मास संस्थेशी चर्चा करून समय सुचकता आणि काळाची गरज म्हणून येणा-या काळात नव्याने सुधारित आदेश जारी करावेत. उत्पादन- उदयोगांमुळे त्या त्या भागातील अर्थचक्राला गती मिळत असते. ठप्प होण्याचे मार्गावर असलेल्या साताराच्या औदयोगिक अर्थचक्राला गती देण्याचे नैतिक कर्तव्य जिल्हा प्रशासनानेआणि राज्य औदयोगिक विकास महामंडळाने संयुक्त जमानदारीतुन पार पाडावे, असे निवेदनात म्हटले आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख