मोक्क्यातील फरार गुंड बंटी जाधवच्या आवळल्या मुसक्या; सातारा एलसीबी पथकाची पंजाबात कारवाई 

एलसीबीच्या अधिकाऱ्यांना बंटी आपल्या चार साथीदारांसह नेपाळमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नेपाळमध्ये जाऊन त्याचा शोध घेतला. पणबंटीला नेपाळ सीमेवरच असताना सातारा एलसीबीचे पथक आपल्यामागावर असल्याची खबर मिळाली. त्यामुळे त्याने नेपाळला न जाता पंजाबमध्ये गेला.
Fugitive goon Bunty Jadhav arrested in Punjab
Fugitive goon Bunty Jadhav arrested in Punjab

सातारा : भुईंज (ता. वाई) येथील मोक्क्याच्या गुन्ह्यातील फरार गुंड बंटी जाधवसह त्याच्या चार साथीदारांच्या सातारा एलसीबीच्या पथकाने पंजाब
मध्ये जाऊन मुसक्या आवळल्या आहेत. सातारा एलसीबीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलिस अधीक्षकांनी कौतूक केले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, भुईंज (ता. वाई) येथील कुख्यात गुंड बंटी जाधव याने टोळी तयार केली होती. या टोळीतील सहकाऱ्यांच्या मदतीने भुईंज येथील आसले पुलावर राहणाऱ्या युवकाचे त्यांनी अपहरण करून त्याचा खून केला होता. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने भुईंज स्मशानभूमीत त्याचा मृतदेह जाळला होता.

या घटनेनंतर बंटीने तेथून पलायन केले होते. लॉकडाउनच्या काळात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत बंटी जाधव वाई शहरात आला होता. यावेळी त्याने चारचाकी वाहनातून आपल्या  साथीदारांसह प्रवेश करून
तेथील रविवार पेठेतील दुसऱ्या टोळीच्या वर्चस्व वादातून लाठ्या काठ्या घेऊन दहशत माजवत प्रतिस्पर्धी टोळीवर पिस्तूलातून गोळ्या झाडल्या होत्या.

त्या प्रकारानंतर वाई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जाधवने पलायन केले होते. त्याचा शोध घेण्याचे आव्हान वाई पोलिसांपुढे होते.  या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत साताऱ्याचे पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी घेऊन सातारा एलसीबीचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना बंटी जाधव याचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

तेव्हा पासूनच एलसीबीचे अधिकारी व कर्मचारी बंटीच्या मागावर होते. 
एलसीबीच्या अधिकाऱ्यांना बंटी आपल्या चार साथीदारांसह नेपाळमध्ये असल्याची माहिती  मिळाल्यानंतर त्यांनी नेपाळमध्ये जाऊन त्याचा शोध घेतला. पण बंटीला नेपाळ सीमेवरच असताना सातारा एलसीबीचे पथक आपल्या मागावर असल्याची खबर मिळाली. त्यामुळे त्याने नेपाळला न जाता पंजाबमध्ये गेला.

याची माहिती पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी पंजाबमध्ये जाऊन त्याच्यासह त्यांच्या चार साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. या कामगिरीबद्दल सातारा एलसीबीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी अभिनंदन करून कौतूक केले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com