दिल्लीत वीजबिल माफ मग महाराष्ट्रात का नाही; वीज कनेक्शन तोडल्यास संघर्ष अटळ - Electricity bill waiver in Delhi then why not in Maharashtra; Conflict is inevitable if the power connection is broken | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

दिल्लीत वीजबिल माफ मग महाराष्ट्रात का नाही; वीज कनेक्शन तोडल्यास संघर्ष अटळ

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 मार्च 2021

महाराष्ट्रातील विजेच्या गरजेपैकी जवळजवळ निम्मी वीज सातारा जिल्ह्यात तयार होते. कोरोना महामारीमुळे वर्षभर संपूर्ण जनजीवन विस्कळित आहे. कौटुंबिक गरजा भागवताना सर्वांचीच तारेवरची कसरत होते. आज वीजपुरवठा अत्यावश्‍यक असून, कोरोनामुळे बहुतांशी शैक्षणिक कार्य ऑनलाइन सुरू आहे. वीजपुरवठा खंडित झाला तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार आहे.

सातारा : कोरोनामुळे ग्रामीण व शहरी भागातील सर्वच नागरिक त्रस्त आहेत. अशा स्थितीत वीज जोडणी अत्यावश्‍यक आहे; पण वीजबिलांच्या थकबाकीमुळे कनेक्‍शन तोडण्याची कारवाई वीज कंपनीकडून होत आहे. हा प्रकार निश्‍चितच वेदनादायी असून टप्प्याटप्प्याने रक्‍कम भरण्याचा निर्णय घेऊन कंपनीने महामारीने त्रस्त जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी वीज वितरण कंपनीला दिला आहे. 

दिल्लीसारख्या राज्यात वीजबिल काही युनिटपर्यंत पूर्णपणे माफ आहे. तेथे शेतकऱ्यांना ठराविक युनिटपर्यंत वीज मोफत पुरवली जाते. त्या राज्याचे प्रतियुनिट दर देखील खूप कमी आहेत, असे स्पष्ट करून उदयनराजे म्हणाले, "वीज वितरण कंपनी देशात अग्रेसर राहिली आहे. कोरोना काळातही वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अखंड वीजपुरवठा करण्याचे काम केले आहे. त्यामुळे पाणीपुरवठाही सुरळीत राहिला.

महाराष्ट्रातील विजेच्या गरजेपैकी जवळजवळ निम्मी वीज सातारा जिल्ह्यात तयार होते. कोरोना महामारीमुळे वर्षभर संपूर्ण जनजीवन विस्कळित आहे. कौटुंबिक गरजा भागवताना सर्वांचीच तारेवरची कसरत होते. आज वीजपुरवठा अत्यावश्‍यक असून, कोरोनामुळे बहुतांशी शैक्षणिक कार्य ऑनलाइन सुरू आहे. वीजपुरवठा खंडित झाला तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार आहे.

सध्या शहरी भागासह ग्रामीण भागातील सर्व कुटुंबातील बहुतांशी कामे ही विजेवर अवलंबून आहेत. कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळातील तीन- चार महिन्यांची वीजबिले एकत्रितपणे कालांतराने दिल्याने ती भरताना सर्वसामान्यांचे नियोजन गडबडले आहे.'' एकत्रित वीजबिल दिल्याने एकूण युनिटचा दर लागला आहे. यामध्ये वीज ग्राहकाचे दुहेरी नुकसान झाले आहे.

अशा परिस्थितीत थकीत वीजबिल टप्प्याटप्प्याने भरण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायला हवा. याबाबत धोरणात्मक निर्णय मंडळाने घेतला पाहिजे. कोरोनासारख्या महामारीत वीजबिल थकबाकीमुळे वीज कनेक्‍शन तोडण्याची कारवाई होणार असेल. तर ते जनता कदापि मान्य करणार नाही. अशावेळी आम्ही वीज ग्राहकांच्या बाजूने ठाम उभे राहणार आहोत, तसेच कोणाकोणाची वीज तोडली याचा आढावा घेऊन त्याचा जागेवरच सोक्ष मोक्ष लावताना संघर्ष अटळ असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख