दारूच्या नशेत शिपायाने टाकले टीसीएल पावडरचे अख्खे पोतेच विहिरीत....मग काय झाले असेल.... - The drunken peon threw the whole pot of TCL powder into the well | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

दारूच्या नशेत शिपायाने टाकले टीसीएल पावडरचे अख्खे पोतेच विहिरीत....मग काय झाले असेल....

महेश बारटक्के
बुधवार, 16 जून 2021

विहिरीतील सर्व दूषित पाणी उपसा करण्यात आले आहे. गावामध्ये घर ते घर आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. झालेल्या प्रकारची सर्व सखोल चौकशी करून ग्रामपंचायतीच्या शिपायावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. 

कुडाळ : सरताळे (ता. जावळी) येथे ग्रामपंचायतीच्या शिपायाने दारूच्या नशेत गावच्या विहिरीत टीसीएल पावडरचे आख्खे पोते टाकले. यामुळे पन्नासहून अधिक ग्रामस्थांना बाधा झाली. हे पाणी पिल्याने ग्रामस्थांना उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभाग कामाला लागले असून बाधितांवर वाई, पाचवड व सातारा येथील विविध रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. एका ग्रामस्थाची प्रकृती गंभीर झाली आहे. The drunken peon threw the whole pot of TCL powder into the well

सरताळे येथील ग्रामपंचायतीच्या शिपायाने दारुच्या नशेत गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत एक किलो टीसीएल पावडरच्या ऐवजी संपूर्ण पिशवीच विहिरीमध्ये टाकली. आज सकाळी नियमितपणे गावातील नळ पाणीपुरवठा योजनेतून घराघरात हे पिण्याचे पाणी पोहचले. हे पाणी पिल्याने गावातील ५० हून अधिक ग्रामस्थांना उलट्या जुलाबाचा त्रास होऊ लागला.

हेही वाचा : मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधानांचे विचार काय आहेत?

या संदर्भात पाण्याची तपासणी केली असता हा सर्व प्रकार दूषित पाणी पिल्याने झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. बाधित व्यक्तींवर सध्या वाई, पाचवड आणि सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर काही जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. हा सर्व प्रकार केवळ बेजबाबदारपणामुळे घडला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटू लागल्या आहेत.

आवश्य वाचा : भारताने ब्रिटनचे पाहून कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवलं पण कमी नाही केलं!

याबाबत जावळीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मंगळवारी सायंकाळी आणि बुधवारी पहाटे असे दोन वेळा टीसीएल पावडर संबंधित गावच्या विहिरीत शिपायाकडून टाकण्यात आली. त्यामुळे बुधवारी सकाळच्या पाणीपुरवठा मध्ये हे पाणी वापरात आले. काही नागरिकांना उलट्या जुलाबाची लागण झाली.

यातील सर्वांची प्रकृती चांगली असून एका ग्रामस्थाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विहिरीतील सर्व दूषित पाणी उपसा करण्यात आले आहे. गावामध्ये घर ते घर आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. झालेल्या प्रकारची सर्व सखोल चौकशी करून ग्रामपंचायतीच्या शिपायावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख