सुरेश भोसले यांनी आधीचे सर्व रेकॉर्ड मोडत कृष्णा कारखाना राखला... - Dr. Suresh Bhosale broke all previous records and maintained Krishna factory ... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

सुरेश भोसले यांनी आधीचे सर्व रेकॉर्ड मोडत कृष्णा कारखाना राखला...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 3 जुलै 2021

भोसले गटाने दोन्ही पॅनेलचा एकतर्फी धोबीपछाड केला. तब्बल १० हजारांचे मताधिक्क्याने मिळालेला विजय ऐतिहासिकच तर आहेच, त्याशिवाय तो अपेक्षित आणि अवाढव्यही आहे. डॉ. भोसले यांचे नेतृत्व, कारभार आणि प्रतिमा याचाच विजय आहे.

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भोसले गटाच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने बाजी मारली. अनेक दिग्गजांचा धोबीपछाड करत भोसले गटाने दहा हजारांच्या फरकाने मिळवलेल्या यशाने वेगळा इतिहास रचला. ३२ वर्षांत शेकड्यांपासून साडेतीन हजारांच्या मताधिक्क्याचे सारे विक्रम मोडीत काढत कारखान्यावर भोसले गटाने निर्विवाद वर्चस्व ठेवले आहे.  Dr. Suresh Bhosale broke all previous records and maintained Krishna factory ...

कृष्णा कारखान्यात १९८४ नंतर ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी जयवंतराव भोसले यांच्या विरोधात रान उठवले. त्यामुळे १९८९ पहिल्या ऐतिहासिक सत्तांतराची नोंद झाली. त्यावेळी सभासद होते केवळ २७ हजारांच्या आसपास. त्यावेळी मोहिते यांचे पॅनेलही केवळ २५०० मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यानंतरच्या ३२ वर्षात कृष्णेच्या निवडणुकांचा सिलसिला, त्यात मोहिते गटाने १९८९ नंतर खुले सभासदत्व ठेवले. १३ हजार ५२८ सभासद वाढवले. त्याचा १९९४ मध्ये फायदा होईल, अशी अपेक्षा होती. 

हेही वाचा : EDकडून तिसरे समन्स ; अनिल देशमुख दिल्लीला रवाना 

मात्र मोहिते गटाला मोठे व अपेक्षित यश मिळाले नाही. त्यांचे पॅनेल विजयी झाले, त्यावेळी त्यांचा केवळ साडेतीन हजाराने विजय झाला. भोसले गटाने खुल्या सभासदत्वाच्या मुद्दावरून कोर्ट कचेरी केली. त्यात १९९९ ची निवडणुकीत भोसले गट विजयी झाला. तोही केवळ दीड हजारांच्या फरकानेच. मोहिते गटानेही पुढची तयारी २००५ मध्ये झालेल्या निवडणुकीत मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजीत मोहितेंना सभासदांनी पंसती दिली. त्यांचे पॅनेल दोन हजारांच्या फरकाने सत्तेवर आले. त्यानंतर २००७ मध्ये मोहिते-भोसले यांचे मनोलिलन झाले.

आवश्य वाचा : आता, पेट्रोलही १०५ वर थांबेल..रोहिणी खडसेंचा भाजपला टोला

२०१० मध्ये झालेल्या निवडणुकीला एकत्रित सामोरे गेले. मात्र  मनोमिलनाचा पराभव करून अविनाश मोहिते यांचे पॅनेल अडीच हजारांच्या फरकाने विजयी झाले. त्यानंतर २०१५ मध्ये सत्ताधारी अविनाश मोहिते यांच्या विरोधात डॉ. सुरेश भोसले व डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी पॅनेल उभे केले. तिरंगी लढतीत, भोसले गटाने बहुमत मिळवले. मात्र मताधिक्क्य काही शेकड्यात होते.

त्या पार्श्वभूमीवर कालची निवडणूक झाली. भोसले गटाने दोन्ही पॅनेलचा एकतर्फी धोबीपछाड केला. तब्बल १० हजारांचे मताधिक्क्याने मिळालेला विजय ऐतिहासिकच तर आहेच, त्याशिवाय तो अपेक्षित आणि अवाढव्यही आहे. डॉ. भोसले यांचे नेतृत्व, कारभार आणि प्रतिमा याचाच विजय आहे. डॉ. भोसले यांच्या व्यक्तीमत्वानेच निवडणुकीचा चेहरामोहराच बदलून टाकला.

कृष्णा काठचा संकटमोचक....

डॉ. सुरेश भोसले यांच्या आत्तापर्यंतच्या दोन टर्म झाल्या. दोन्ही टर्मला सहा वर्षांचा कालावधी मिळाला. पहिल्या टर्मला (१९९९ ते २००५) लोकरी माव्याचे तर दुसऱ्या टर्मला (२०१५ ते २०२१) कोरोनाचे संकट कारखानदारीवर आलं. दोन्ही संकटातून मार्ग काढण्यात डॉ. भोसले यशस्वी झाले. कारखनादारीसह सभासदांच्या हिताचे निर्णय अशाही संकट काळात त्यांनी घेतले. त्यामुळे कृष्णाकाठचा संकटमोचक म्हणून डॉ. भोसले यांचे व्यक्तीमत्व निवडणुकीत अत्यंत महत्वाचे ठरले आहे. त्याचाही फायदा झालाच.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख