शंभूराज देसाई जिल्हा बँकेची निवडणूक लढणार.....

मुळात मागील निवडणुकीत मंत्री देसाई यांना जिल्हा बँकेवर संचालक म्हणून घेण्याबाबतचा शब्द राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला होता. मात्र, त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे आता शिवसेनेनेही बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
शंभूराज देसाई जिल्हा बँकेची निवडणूक लढणार.....
District Central Bank lists studied; Shivsena is fully prepared to contest elections .....

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या याद्यांचा आम्ही अभ्यास केला असून बँकेची निवडणूक लढण्याची आमची पूर्ण तयारी आहे. पक्ष श्रेष्ठींनी आदेश दिला तर आम्ही रिंगणात आहोत, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. District Central Bank lists studied; Shivsena is fully prepared to contest elections .....

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कच्ची मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेवर संचालक म्हणून जाण्यासाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पक्षिय राजकारणात महाविकास आघाडीतील घटक पक्ष या निवडणुकीत एकत्र दिसणार का हा महत्वाचा प्रश्न आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीन जिल्हा बँकेवर जाण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, माणचे नेते शेखर गोरे हे इच्छुक आहेत. यासंदर्भात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या याद्यांचा आम्ही अभ्यास केलेला आहे. बँकेची निवडणूक लढण्याची आमची पूर्ण तयारी आहे. पक्ष श्रेष्ठींनी आदेश दिला तर आम्ही रिंगणात आहोत, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मुळात मागील निवडणुकीत मंत्री देसाई यांना जिल्हा बँकेवर संचालक म्हणून घेण्याबाबतचा शब्द राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला होता. मात्र, त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे  आता शिवसेनेनेही बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून जर ही निवडणूक लढली गेली नाही तर जिल्हा बँकेत दोन पॅनेल पहायला मिळणार आहेत. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in