वैभव नाईकांनी नारायण राणेंचा पेट्रोलपंप निवडला आणि तेथेच ठिणगी पडली....

पेट्रोलपंपाच्या बाहेर वैभव नाईक लोकांना एक लिटर पेट्रोलच्या पैशाचे पाकीट वाटप करत असतानाच तिथे येऊन भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला. शाब्दिक बाचाबाची वाढत गेली.
Narayan Rane-Vaibhav Naik
Narayan Rane-Vaibhav Naik

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात राजकीय राडे तसे नवीन नाहीत. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे राडे थांबले होते. मात्र आज कुडाळमध्ये या राड्यांची पुनरावृत्ती झाली. निमित्त होत शिवसेनेच्या वर्धापन दिनाच आणि त्यानिमित्त मिळणाऱ्या पेट्रोलचं. शाब्दीक बाचाबाचीतून हमरी तुमरीवर आलेल्या या प्रकरणात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला. मात्र पुन्हा एकदा या निमित्ताने सिंधुदुर्गच राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. Dispute between Sindhudurg Shiv Sena and BJP workers

शिवसेनेचा वर्धापन दिनानिमित्ताने आज कुडाळमध्ये एक लिटर पेट्रोलच्या पैशाचे वाटप करण्याचे ठरविण्यात आले होते. कुडाळमधील नारायण राणेंच्या पेट्रोल पंपावर हे मोफत एक लिटर पेट्रोल मिळणार असं जाहीर करण्यात आलं होतं. तसेच उपरोधिक म्हणून भाजपच्या सदस्यांना एक लिटर मोफत पेट्रोल देण्याचं ही जाहीर करण्यात आलं होतं. संभाव्य धोका ओळखून सकाळपासूनच पोलिसांनी कडक बंदोबस्त या पंपावर ठेवला होता. भाजपचे कार्यकर्ते ही जमले आणि वादास तोंड फुटले. 

भाजपचे कार्यकर्ते सकाळपासूनच या राणेंच्या भारत पेट्रोलियमच्या पंपावर जमले होते. आमदार वैभव नाईक आपल्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी आले आणि वातावरण तंग बनलं. पेट्रोल पंपाच्या बाहेर वैभव नाईक लोकांना एक लिटर पेट्रोलच्या पैशाचे पाकीट वाटप करत असतानाच तिथे येऊन भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला. शाब्दीक बाचाबाची वाढत गेली. आक्रमक झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करायला अटकाव केला. दोन्ही कडचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. अखेर उग्र झालेल्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले आणि एक मोठा राडा होता होता राहिला.

दोन्ही कडचे कार्यकर्ते एवढे उग्र झाले होते की एकमेकांवर तुटून पडले.पोलिसांची कुमक जास्त होती.त्यामुळे त्यांनी तातडीने सर्व कार्यकर्त्यांना बाजूला केले. पोलिसांच्या आजच्या भूमिकेमुळेच मोठा राडा होऊ शकला नाही. पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आमदारांसाहित बाजूला नेले. त्यानंतर हायवेवरील इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर शिवसेनेकडून लोकांना पेट्रोलसाठी पैसे वाटण्यात आले. मात्र या दोन्ही कडच्या कार्यकर्त्यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

-आनंद शिरवलकर (भाजप जिल्हा कार्यकारिण सदस्य)

सिंधुदुर्ग म्हटलं की राजकीय राडेबाजी नवीन नाही पण काही वर्ष ही राडेबाजी थांबली होती. परंतु शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिन पुन्हा एकदा पुनरावृत्ती पाहायला मिळाली. आमदार वैभव नाईक आणि त्यांचे कार्यकर्ते तसेच भाजपचे कार्यकर्ते एकमेकांनासमोर आल्याने जोरदार घोषणाबाजी देण्यात आली त्यातून पुन्हा एकदा राडेबाजी पाहायला मिळाली पण मात्र पोलिस वेळीत पोचल्यावर अनर्थ टळला आहे.
- शंकर कोरे (पोलिस निरीक्षक कुडाळ)

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com