"कृष्णा'च्या सभेत संचालकांना बोलायची बंदी...! - Director banned from speaking at Krishna's meeting says Avinash Mohite | Politics Marathi News - Sarkarnama

"कृष्णा'च्या सभेत संचालकांना बोलायची बंदी...!

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 27 मार्च 2021

सभेला संस्थापक पॅनेलचे संचालक पूर्णवेळ उपस्थित होते. सभा काही मिनिटांत संपविली. त्यामुळे आता उत्तर कोणाच्या तरी नावाने पत्रक काढून दिली जातील. तसे होऊ नये. विद्यमान अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तरे द्यावीत. सभास्थळी प्रश्नकर्त्यांचे माईक काढून घेतले. सभा ऑनलाइन असूनही सभासदांना सहभागी होता आले नाही. त्यामुळे सभा म्हणजे सोपस्कार होते.

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन झाली. यामध्ये काही सभासदांना मते मांडू दिली नाहीत. सभास्थळी आलेल्या संचालकांच्या टेबलावरील माईक काढून घेतले. आम्ही विरोधक म्हणून बोलू द्यायचे नसेलही मात्र, सत्ताधारी गटातील संचालकांनाही बोलायची का बंदी घातली. या सर्व प्रश्नांची उत्तरे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी स्वतः द्यावीत, असे आव्हान संस्थापक पॅनेलचे प्रमुख अविनाश मोहिते यांनी दिले आहे. 

अविनाश मोहिते म्हणाले, "सभेत स्वागत, प्रास्ताविकासह आलेल्या 59 प्रश्नांपैकी दोन, चार प्रश्नांची उत्तरे देऊन खुद्द अध्यक्षांनीच आता सभा संपवूया, असे म्हणणे आणि हजारो सभासदांनी ऑनलाइन पाहणे, हा सगळा हास्यापद प्रकार "कृष्णा' च्या वार्षिक सभेत दिसला. सर्वसाधारण सभेत 59 प्रश्नांपैकी कोणत्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांना देता आले नाही. 

सभेला संस्थापक पॅनेलचे संचालक पूर्णवेळ उपस्थित होते. सभा काही मिनिटांत संपविली. त्यामुळे आता उत्तर कोणाच्या तरी नावाने पत्रक काढून दिली जातील. तसे होऊ नये. विद्यमान अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तरे द्यावीत. सभास्थळी प्रश्नकर्त्यांचे माईक काढून घेतले. सभा ऑनलाइन असूनही सभासदांना सहभागी होता आले नाही. त्यामुळे सभा म्हणजे सोपस्कार होते.

सभेला विरोधक संचालक समोर पूर्णवेळ उपस्थित असणे हेच त्यांना झोंबले. ते ऑनलाइन सहभागी झालेल्या भासदांनी पाहिले. कारखान्याची सप्टेंबर 2019 सभा झाली. त्या सभेसाठीही उपस्थित राहण्यासाठी गेलो. त्या वेळी भाजपचे सरकार असल्याने पोलिसांचा वापर करून सभास्थळी प्रवेशच करू दिला नाही. या वेळी सभा ऑनलाइन होती. त्यामुळे सहभागी होणे शक्‍य होते. मात्र, सभासदांनी निवडून दिले असल्याने आम्ही प्रत्यक्ष सहभागी झालो. तत्पूर्वी मुदतीत लेखी स्वरूपात आम्ही प्रश्न विचारले होते. त्याची उत्तरे त्यांनी दिली नाहीत.'' 

सभासदांना हिशेब द्या 
कृष्णा कारखान्याच्या वजन काट्याबाबतचा भोसले गटाच्या एका नेत्याचा ऑडिओ संस्थापक पॅनेलचे मार्गदर्शक प्रशांत पवार यांनी पत्रकारांना ऐकवला. त्यात प्रतिक्विंटल 40 किलो जास्त उसाचा धर्मकाटा असल्याचे जाहीर वक्तव्य ते नेते करत होते. त्यामुळे 40 किलोप्रमाणे आतापर्यंत गाळप झालेल्या जादा उसाचा हिशोब सभासदांना सत्ताधाऱ्यांनी द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख