पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांचा राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मान 
Deputy Superintendent of Police Navnath Dhawale honored with President's Bravery Medal

पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांचा राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मान 

त्यांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात अनेक मोहीमा यशस्वी केल्या. त्यातील मे 2017 मध्ये धानोरा उपविभागातील चातगाव पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील हुर्रेकसा जंगल परिसरात ढवळे यांनी त्यांच्या पथकाने कुप्रसिद्ध नक्षली रजिता उसेंडी हिचा खात्मा केला.

कऱ्हाड : कऱ्हाडच्या पोलिस उपअधीक्षकपदी काम केलेले व ठाणे जिल्हात शहापूरचे पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कामगिरीबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे. Deputy Superintendent of Police Navnath Dhawale honored with President's Bravery Medal

श्री. ढवळे 2015-17 या काळात गडचिरोली जिल्हा पोलिस दल ऑपरेशन उपविभागीय पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात अनेक मोहीमा यशस्वी केल्या. त्यातील मे 2017 मध्ये धानोरा उपविभागातील चातगाव पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील हुर्रेकसा जंगल परिसरात ढवळे यांनी त्यांच्या पथकाने कुप्रसिद्ध नक्षली रजिता उसेंडी हिचा खात्मा केला. 

उसेंडी हिच्यावर 139 गुन्हे दाखल होते. तिला पकडण्यासाठी 16 लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. ही चकमक तब्बल बारातास सुरु होती. श्री. ढवळे आणि त्यांच्या सहकार्यांनी जीवाची बाजी लावत ही कामगिरी केली होती. या कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. मुळ अहमदनगर जिल्ह्यातील वडजिरे गावातील असलेल्या ढवळे यांनी कऱ्हाडलाही उत्तम कामगिरी केली होती. त्यानंतर चिपळूणला पोलिस उपअधीक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूरचे पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in