संभ्रम निर्माण करण्यापेक्षा पालिकेस सहकार्य करा; फेरीवाल्यांना वाढीव एक हजारांची मदत देणार....   - Cooperate with the municipality rather than creating confusion; An additional one thousand will be given to the peddlers says MP Udayanraje | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

संभ्रम निर्माण करण्यापेक्षा पालिकेस सहकार्य करा; फेरीवाल्यांना वाढीव एक हजारांची मदत देणार....  

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

नुकतीच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली १५०० रूपयांची मदत पात्र पथविक्रेत्यांना देण्यात कोणतीही समस्या उद्भवणार नाही. याकामी शासनाच्या निर्देशानुसार फेरीवाल्यांना १५०० रुपये नुकसान रक्कम सातारा पालिकेच्या माध्यमातुन दिली जाईल. सध्याची आपत्कालिन परिस्थिती पहाता टीका करणा-यांना नीट माहिती मिळाली असती तर त्यांनी अशी टीका केली नसती.

सातारा : राज्य शासनाने घोषित केलेली रक्कम तुटपुंजी असली तरी दिलासा देणारी आहे. म्हणूनच शासनाने फेरीवाल्यांना दिलेल्या १५०० रूपयांच्या मदतीत सातारा पालिकेच्या स्वनिधीतून आणखीन एक हजार रूपये घालून प्रतिफेरीवाल्यांना ही रक्कम देण्याचा  धोरणात्मक निर्णय घेतला आहे. फेरीवाल्यांप्रती सहानुभुतीमुळे टीका करणा-यांनी थोडी माहिती घेतली असती तर त्यांना वस्तुस्थिती समजली असती. सध्याच्या कोरोनाच्या भीषण परिस्थितीत अकारण संभ्रमावस्था निर्माण करण्यात हातभार न लावता त्यांनी पालिका प्रशासनास सहकार्य करावे, असा सल्ला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना दिला आहे.  

सातारा पालिकेच्या निष्काळजीपणामुळे फेरीवाल्यांचे नुकसान झाल्याचा आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या आरोपाचे उदयनराजेंनी खंडण केले आहे. फेरीवाल्याबाबतची वस्तुस्थिती मांडताना उदयनराजे म्हणाले, सातारा पालिका आणि फेरीवाला संघटना यांच्या माध्यमातुन सातारा शहरातील 1621 पथविक्रेत्यांच्या सर्वेक्षणाचे काम यापूर्वीच पूर्ण झालेले आहे. त्यापैकी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेतून 2020-21 मध्ये 754 पथविक्रेत्यांच्या खात्यात 10 हजार रूपयांची रक्कम थेट जमा केली आहे.

या व्यतिरिक्त 867 फेरीवाल्यांची प्रकरणे मंजूर असून रक्कम वितरण करण्याची प्रक्रिया लवकरच होणार आहे. नुकतीच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली १५०० रूपयांची मदत पात्र पथविक्रेत्यांना देण्यात कोणतीही समस्या उद्भवणार नाही. याकामी शासनाच्या निर्देशानुसार फेरीवाल्यांना १५०० रुपये नुकसान रक्कम सातारा पालिकेच्या माध्यमातुन दिली जाईल. सध्याची आपत्कालिन परिस्थिती पहाता टीका करणा-यांना नीट माहिती मिळाली असती तर त्यांनी अशी टीका केली नसती.

म्हणूनच केलेल्या टीकेला सकारात्मकतेच्या भावनेतून उत्तर देत आहे, असे सांगून उदयनराजे भोसले म्हणाले, राज्य शासनाने घोषित केलेली रक्कम तुटपुंजी असली तरी दिलासा देणारी आहे. म्हणूनच त्या रक्कमेत सातारा पालिकेच्या स्वनिधीतून आणखीन एक हजार रूपये प्रमाणे प्रतिफेरीवाल्यांना देण्याबाबत आम्ही धोरणात्मक निर्णय घेतला आहे. फेरीवाल्यांप्रती पारदर्शीधोरण राबविण्यात येणार आहे.

कोरोनाच्या कठीण पार्श्वभूमीवर सातारा विकास आघाडीच्या व्यक्तीगत स्तरावरुन देखील शासनाच्या घोषणेप्रमाणे आर्थिक मदत दिली जाईल, असे उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे. कोणतीही पात्र व्यक्ती आर्थिक मदतीपासून वंचित राहणार नाही. असेच धोरण पालिकेच्या स्तरावर राबवले जाणार आहे. त्याबद्दल कोणीही संभ्रम करुन घेऊ नये, असा सल्ला उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिला आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख