माझ्यावर गुन्हा दाखल करा, जेलमध्ये ठेवा; पण, मराठा बांधवांना त्रास देऊ नका... - Charge me, put me in jail; But, don't bother the Maratha brothers ... | Politics Marathi News - Sarkarnama

माझ्यावर गुन्हा दाखल करा, जेलमध्ये ठेवा; पण, मराठा बांधवांना त्रास देऊ नका...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 जुलै 2021

मराठा जण आक्रोश आंदोलन संपन्न झाल्यानंतर निवेदन देण्यासाठी ते जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गेले होते, यावेळी मराठा समन्वयक आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. 

सोलापूर : सोलापूर प्रशासनाने गरीब मराठा बांधवाला कुठलाही त्रास देऊ नये.. गुन्हे दाखल करायचे असतील तर माझ्यावर करा, 15 दिवस जेलमध्ये ठेवा. पण मराठा बांधवांना त्रास देऊ नका अशी विनंती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना त्यांच्या दालनात जाऊन केली आहे. Charge me, put me in jail; But, don't bother the Maratha brothers ...

सोलापूरमध्ये काल छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ 'जनआक्रोश मोर्चा' काढण्यात आला होता. या आंदोलनासाठी आठ ते दहा हजार मराठा आंदोलक सहभागी झाले होते. 

हेही वाचा : शिवसेनेशी युतीवर फडणवीसांचे सूचक वक्तव्य; म्हणाले, परिस्थितीनुसार निर्णय!

त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, माजीमंत्री, नगरसेवक ही आवर्जून उपस्थित होते. वास्तविक या मोर्चाला कोविड शासन नियमांमुळे परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, तरीही शासन आदेश झुगारून मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला. 

आवश्य वाचा : कोल वॉशरी घोटाळा : हिंद एनर्जीची चौकशी केल्यास अनेक जण तुरुंगात जातील

दरम्यान, ''सोलापूर प्रशासनाने गरीब मराठा बांधवाला कुठलाही त्रास देऊ नये.. गुन्हे दाखल करायचे असतील तर माझ्यावर करा,  15 दिवस जेलमध्ये ठेवा पण मराठा बांधवांना त्रास देऊ नका,'' अशी विनंती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना त्यांच्या दालनात जाऊन केली आहे. मराठा जण आक्रोश आंदोलन संपन्न झाल्यानंतर निवेदन देण्यासाठी ते जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गेले होते, यावेळी मराठा समन्वयक आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख