सीएसआरमधून कोविड हॉस्पिटल उभारा; अन्यथा वेगळा विचार करावा  लागेल - Build Covid Hospital from CSR; Otherwise you have to think differently says MP Udayanraje | Politics Marathi News - Sarkarnama

सीएसआरमधून कोविड हॉस्पिटल उभारा; अन्यथा वेगळा विचार करावा  लागेल

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 8 मे 2021

कंपन्या हा खर्च करून स्थानिक नागरिकांवर उपकार करत नसून ते त्यांना कायद्याने बंधनकारक आहे. जर या निधीमधून स्थानिक जनतेसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली नाही. तर कंपन्यानी शासकीय योजनांचा आतापर्यंत घेतलेल्या फायद्याचा हिशोब करून त्यासंदर्भात वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिला आहे. 

सातारा : कोरोनाचा वाढता संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उद्योगांनी (Industries) सामाजिक दायित्व निधीचा (CSR) वापर करून कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी तातडीने हॉस्पिटल (Corona Hospital) उभी करावीत. अन्यथा कंपन्यांनी आजपर्यंत घेतलेला शासकिय योजनांचा लाभाचा हिशोब करून त्यासंदर्भात वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी जिल्ह्यातील उद्योगांना दिला आहे. (Build Covid Hospital from CSR; Otherwise you have to think differently says MP Udayanraje)

यासंदर्भात खासदार उदयनराजे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील सेझ व डी झोनचा फायदा घेतलेल्या कंपन्यांच्या ताळेबंद प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी मागवावा. तसेच कंपन्याकडील सामाजिक दायित्व निधीमधून सातारा जिल्ह्यात कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी कोरोना हॉस्पिटल उभे करावेत, अशी सूचना त्यांनी मांडली.

हेही वाचा : कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर कंगना म्हणाली, हा एक छोटा फ्लू असून, तो माझ्या शरीरात पार्टी करतोय!

एमआयडीसीचे अधिकारी, कंपन्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलवावी. या बैठकीस येताना उद्योगांना त्यांचा ताळेबंद बरोबर घेऊनच
बोलवावे. अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. कंपन्या हा खर्च करून स्थानिक नागरिकांवर उपकार करत नसून ते त्यांना कायद्याने बंधनकारक आहे. जर या निधीमधून स्थानिक जनतेसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली नाही. तर कंपन्यानी शासकीय योजनांचा आतापर्यंत घेतलेल्या फायद्याचा हिशोब करून त्यासंदर्भात वेगळा विचार करावा 
लागेल, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिला आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख