पंढरपूरात भाजप दहा हजाराने विजयी होणार : बाळा भेगडेंना विश्वास

मंगळवेढ्यात आमदार प्रशांत परिचारक गट प्रभावी आहे. त्यांचे प्रत्येक गावात कार्यकर्ते आहेत. त्यात मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन केल्यामुळे द्राक्षांचा भाव ६० हून वीस रुपयांवर आला. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी नाराज होता. औदुंबरअण्णा पाटलांच्या काळात पन्नास कोटी रुपयांनी फायद्यात असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना भालकेंकडे गेल्यानंतर आता तो साडेपाचशे कोटी रुपयांनी कर्जबाजारी झाला आहे.
BJP will win in Pandharpur by ten thousand: Bala Bhegade believes
BJP will win in Pandharpur by ten thousand: Bala Bhegade believes

पिंपरी : प्रचाराचे योग्य नियोजन आणि नेते, कार्यकर्ते तसेच आणि आवताडे व परिचारक गट एकत्र आल्याने पंढरपूर-मंगळवेढ्यामध्ये भाजप दहा ते पंधरा हजार मतांनी विजयी होईल, असा दावा सोलापूरचे भाजप प्रभारी आणि माजी मंत्री बाळा ऊर्फ संजय भेगडे यांनी सरकारनामाशी बोलताना आज केला. 

उद्या (रविवारी) या पोटनिवडणूकीचा निकाल आहे. भाजपने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्याने भेगडे हे १५ दिवस पंढरपूरात तळ ठोकून होते. शेवटी त्यांना कोरोनाने गाठल्यामुळे मतदानाच्या दिवशी आपल्या घरी तळेगांव दाभाडे येथे (ता.मावळ, जि. पुणे) ते परतले होते. ही पंढरपूरची पोटनिवडणूक महाविकास आघाडी सरकारविरुद्ध जनेतेच्या रोषाची भावना व्यक्त करणारी होती, असे सांगत आतापर्यंतच्या निवडणूका  एकेमकांविरोधात लढलेले आवताडे आणि परिचारक गट यावेळी भाजपच्या झेंड्याखाली एकत्र आल्याने आमचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास भेगडे यांनी व्य़क्त केला. 

त्यामागील गणित मांडताना ते म्हणाले, मंगळवेढ्यात आमदार प्रशांत परिचारक गट प्रभावी आहे. त्यांचे प्रत्येक गावात कार्यकर्ते आहेत. त्यात मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन केल्यामुळे द्राक्षांचा भाव ६० हून वीस रुपयांवर आला. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी नाराज होता. औदुंबरअण्णा पाटलांच्या काळात पन्नास कोटी रुपयांनी फायद्यात असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना भालकेंकडे गेल्यानंतर आता तो साडेपाचशे कोटी रुपयांनी कर्जबाजारी झाला आहे. 

कारखाना डबघाईला आला असून तेथील तेराशे कामगारांना १३ महिने पगार मिळालेला नाही.हा सगळा रोष जनता या निवडणुकीत व्यक्त करणार आहे. दरम्यान, उद्याच्या निकालात कोणीही विजयी होवो. त्यात मावळचा हातभार असणार हे नक्की आहे. कारण मावळचे माजी आमदार बाळा भेगडे हे, तर जिल्हा प्रभारी असल्याने पंढरपूरात तळच ठोकून होते. त्यामुळे भाजपचे समाधान आवताडे विजयी झाले, तर त्यात त्यांचा व त्यांच्याजो़डीने भोसरीचे भाजपचे पैलवान आमदार महेशदादा लांडगे यांचाही वाटा असणार आहे.

कारण, महेशदादांनीही दोन दिवस या पोटनिवडणूकीत पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला आहे. त्याचे श्रेय दोघांनाही मिळणार यात वाद नाही. तर, राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी दोन दिवस धूमशान प्रचार केला. त्यामुळे भालकेंची जीत झाली, तर त्याचे काहीअंशी श्रेय मावळलाच म्हणजे शेळकेंना जाणार, यात शंका नाही.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com