वारकऱ्यांवरील अन्याय सहन न झाल्यानेच भिडे गुरूजी भेटीला : बंडातात्या कऱ्हाडकर  - Bhide Guruji visited as he could not bear injustice on Warakaris: Bandatatya Karhadkar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

वारकऱ्यांवरील अन्याय सहन न झाल्यानेच भिडे गुरूजी भेटीला : बंडातात्या कऱ्हाडकर 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 जुलै 2021

काही लोकांच्या मनात शंका येण्याची शक्यता आहे.  त्यांची ही भेट ठरलेलीच होती, एकमेकांच्या विचारानेच आले आहेत, असे काहीही नाही. केवळ औपचारिक भेट होती. पूर्वी ठरल्याप्रणाणेच असा कोणताही प्रकार झालेला नाही.

कऱ्हाड : तीन दिवसांपूर्वी प्रशासनाने देहूमध्ये वारकऱ्यांचे आंदोलन राक्षसी पद्धतीने मोडीत काढून मला गाडीत घालून येथे करवडीत आणले. येथे २० जुलैपर्यंत स्थानबद्ध केले आहे. वारकऱ्यांवरील झालेला अन्याय योग्य नसल्याची समाजभावना आहे. त्याच भावनेतून शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे गुरूजी येथे भेटीस आले आहेत. त्यामागे अन्य कोणताही हेतू नाही, अशी माहिती वारकरी सांप्रदायाचे ज्येष्ठ मार्गदर्शक बंडातात्या कऱ्हाडकर यांनी दिली. Bhide Guruji visited  as he could not bear injustice on Warakaris: Bandatatya Karhadkar

शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संभाजी भिडे यांनी आज बंडातात्या कऱ्हाडकर यांची करवडी येथे जाऊन भेट घेतली. त्यावेळी पुंडलिका वरदा हारी विठ्ठलाच्या गजराने परिसर दणाणला. त्यानंतर दोघांनी बराच वेळ गप्पा मारल्या. यावेळी झालेल्या स्थितीबाबत बंडातात्या यांनी भिडे यांना माहिती दिली. त्यानंतर अल्पकाळ दोघांनाही मनोगते व्यक्त केल्यानंतर श्री. भिडे गुरूजी व त्यांचे अनुयायी निघून गेले.

हेही वाचा : ओबीसी आरक्षण : भुजबळ व फडणवीस यांची जुगलबंदी

त्यानंतर बंडातात्या कऱ्हाडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी
त्यांनी संभाजी भिडे यांची भेट औपचारिक होती, असे स्पष्ट केले. श्री. कऱ्हाडकर म्हणाले. पोलिसांनी वारकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढल्यानंतर त्याबद्दल सहानभूती वाटणारे अनेकजण येथे येऊन भेटत आहेत. त्याच पद्धतीने हिंदूत्वावर काम करणारे आक्रमक असणारे भिडे गुरूजी यांनी आज येथे येवून भेटले.

आवश्य वाचा ं: ३१ जुलैपूर्वी `एमपीएससी`सह सर्व नियुक्त्या करणार

त्यांनी अभिमान व स्वाभिमानही व्यक्त केला आहे. श्री. भिडे व त्यांचे
अनुयायी ही येथे आले होते. श्री कृष्ण गोपाल केंद्राकडे केवळ औपचारिक भेटीसाठी आले होते. काही लोकांच्या मनात शंका येण्याची शक्यता आहे.  त्यांची ही भेट ठरलेलीच होती, एकमेकांच्या विचारानेच आले आहेत, असे काहीही नाही. केवळ औपचारिक भेट होती. पूर्वी ठरल्याप्रणाणेच असा कोणताही प्रकार झालेला नाही.

भेटीप्रसंगी गुरूजी यांनी शिदोरी म्हणून संदेश दिला. त्यांनाही मत व्यक्त केले. यापेक्षा वेगळ काही नाही. कारण वारकरी सांप्रदायाचे मुळ हिंदूच आहे. तो सर्वधर्म समभावाचाही आहे. त्यामुळे एका हिंदू संघटनेला वारकऱ्यांवर झालेला अन्याय सहन न झाल्यानेच शिवप्रतिष्ठानने त्यांची भावना सहानभूती व्यक्त केली, त्या भावना आम्ही स्विकराल्या आहेत. यापेक्षा वेगळा काहीही रंग या भेटीला नाही, असे बंडातात्यांनी नमुद केले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख