पायी पालखी सोहळ्यासाठी बंडातात्या आक्रमक.....

आमचे असे म्हणणे आहे की, वाघ म्हणले तरी खातो, वाघोबा म्हणले तरी खातो तर आता वाघ्या म्हणूनच अंगावर घेतला पाहिजे. म्हणून पायी दिंडीसाठी आळंदी येथे दोन जुलै रोजी वारकऱ्यांनी यावे.
पायी पालखी सोहळ्यासाठी बंडातात्या आक्रमक.....
Banda tatya Karadkar is aggressive for Wari

कऱ्हाड : मागील वर्षी कोरानामुळे पादुका प्रथमच वाहनातून गेल्या. परिस्थितीचे गांभीर्य जाणून सांप्रदायाने निर्णय मान्य केला. मात्र यंदाही सोहळा पायी जाऊ नये, असा निर्णय राज्य सरकारने एकतर्फी घेतला आहे. वारकरी सांप्रदायातील लोकांशी चर्चेचे नाटक करत सरकारने निर्णय अबाधित ठेवला. किमान 100 लोकांसह पादुका जाव्यात, या भावनेचाही त्यांनी चुराडा केला आहे. त्यामुळे आषाढी वारीच्या पायी वारीसाठी दोन जुलै रोजी वारकऱ्यांनी आळंदी येथे मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वारकरी सांप्रदायाचे ज्येष्ठ मार्गदर्शक बंडातात्या कऱ्हाडकर यांनी केले आहे. Banda tatya Karadkar is aggressive for Wari

श्री. कऱ्हाडकर यांच्या आवाहानात म्हटले आहे की, ज्ञानोबारायांनी सातशे वर्षांपूर्वी सुरू केलेली सामूहिक दिंडी आजही अखंड व अभंग राहिली आहे. तुकोबारायांचे पश्चात महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव नारायण महाराजांनी दिंडी समाजाचे संघटन केले. ज्ञानोबा - तुकोबारायांच्या पादुका पालखीतून नेवून प्रति वर्षी देहू-आळंदी मार्गे सोहळा चालू लागला.

सोहळ्यात हैबतराव बाबाही चालत होते. 1831 मध्य वादातून सोहळा बंद पडला. त्याचे हैबतराव बाबांना अती वाईट वाटले. माऊलींच्या पादुका पंढरपूरला गेल्या नाहीत ही खंत त्यांना वर्षभर राहिली. त्यांनी पुढीलवर्षी 1832 मध्ये प्रयत्न करून कर्नाटकातील अंकलीचे सरदार श्रीमंत शितोळे सरकार व वासकरांचे सहकार्याने आळंदी ते पंढरपूर स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला. तो आजपर्यंत अव्याहत चालू आहे.

1933 मध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कॉलराच्या साथीमुळे इंग्रजांनी सोहळ्यावर बंदी घातली. ज्ञानेश्वर महाराज संस्थानने पादुका रेल्वेने नेण्याचा निर्णय घेतला मात्र तेव्हा शितोळे सरकारांनी अश्व पायी नेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अभूतपूर्व असा सोहळा ज्ञानेश्वरी पालखीत चालला. तेव्हा पासून 2020 पर्यत तो अखंड चालतो आहे. कोरोनाचे थैमान अखंड महाराष्ट्रात असल्याने सरकारने पायी चालण्यास मना केली.

परिस्थितीचे गांभीर्य जाणून सांप्रदायाने निर्णय मान्य केला व पादुका प्रथमच वाहनातून गेल्या. मात्र यंदा सोहळा पायी जाऊ नये असा निर्णय सरकारने एकतर्फी घेतला आहे. तो चुकीचा आहे. ज्या कोरोनाचा दहशतवाद दीड वर्षे राबवण्यात आला. मुंबई-पुणे गर्दीची शहरे तुडुंब भरून वाहत आहेत. राजकीय मेळावे, विधानसभेची पोट निवडणूक प्रचंड गर्दीत होते, राजकीय पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन होताहेत.

सध्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराच्या सभा व जेवणावळी प्रचंड संख्येत होताहेत. मात्र मंदिरातील भजन, कीर्तने व दिंडी वाटचाल बंद आहे. आमचे असे म्हणणे आहे की, वाघ म्हणले तरी खातो, वाघोबा म्हणले तरी खातो तर आता वाघ्या म्हणूनच अंगावर घेतला पाहिजे. म्हणून पायी दिंडीसाठी आळंदी येथे दोन जुलै रोजी वारकऱ्यांनी यावे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in