प्राणिमित्रांच्या आडमुठ्या धोरणांमुळे शर्यतीवर बंदी.... - Ban on racing due to intrusive policies of animal lovers .... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

प्राणिमित्रांच्या आडमुठ्या धोरणांमुळे शर्यतीवर बंदी....

विशाल गुंजवटे 
बुधवार, 18 ऑगस्ट 2021

बैलगाडी शर्यती त्वरित सुरू करण्यासाठी माझा केंद्र आणि राज्यस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने केंद्रस्तरावर आम्ही प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

बिजवडी : बैलगाडी शर्यतीवर बंदी असल्याने बळिराजाचे लाखोंचे पशुधन कवडीमोल दराने विकावे लागत आहे. नांगरटीसारखी शेतीची कष्टप्रद मशागत, अमानुष छळ करणारी अवजड ऊस वाहतूक सुरू आहे. मात्र, प्रसिद्धीचा स्टंट करणाऱ्या प्राणिमित्रांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे बळिराजाचे अतोनात नुकसान होत आहे. ग्रामीण भागाच्या अर्थचक्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बैलगाडी शर्यती त्वरित सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती माण-खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिली आहे. Ban on racing due to intrusive policies of animal lovers ....
 
माण आणि खटाव तालुक्यांतील बैलगाडी चालक, मालक संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आमदार गोरे म्हणाले, ''जनावरांचे अवैध कत्तलखाने सुरू आहेत. त्यावर बंदीची कारवाई होत नाही. प्रसिद्धीचा स्टंट करणाऱ्या प्राणिमित्रांच्या आडमुठ्या धोरणांमुळे शर्यतीवर बंदी आणली गेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थचक्रावर परिणाम झाला आहे. लाखोंचे पशुधन कवडीमोल किमतीला विकावे लागत आहे.'' 

हेही वाचा : राणेंना पक्षश्रेष्ठींनी दिलं टार्गेट ; शिवसेनेला जेरीस आणण्यासाठी व्यूहरचना

बैलगाडी शर्यती त्वरित सुरू करण्यासाठी माझा केंद्र आणि राज्यस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने केंद्रस्तरावर आम्ही प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मानाजी घाडगे, शहाजी देशमुख, अनिल काटकर, सुनील मोरे, सुधीर जगदाळे, लक्ष्मण लोहार आणि संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

आवश्य वाचा : जयंतराव, आपण एकत्र लढू आणि कॉग्रेसची जिरवू :  भाजपच्या माजी आमदाराची आँफर

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख