दोन लाखांची लाच स्वीकारताना सहायक कामगार आयुक्त जाळ्यात  - Assistant Labor Commissioner caught accepting bribe of Rs 2 lakh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

दोन लाखांची लाच स्वीकारताना सहायक कामगार आयुक्त जाळ्यात 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

यासंदर्भात लाच लुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार हे लेबर सप्लायर व संघटनेचे अध्यक्ष असून शिरवळ मधील कंपनीस कामगार पुरविण्याचे काम करतात. त्यांच्याकडील कामगारांची कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्यासाठी सहायक कामगार आयुक्त संजय महानवर यांनी अकरा लाख रूपयांची मागणी केली होती.

सातारा : शिरवळ येथील कंपनीस लेबर पुरविणाऱ्या ठेकेदाराकडील कामगारांची नोंदणी करण्यासाठी आठ लाखांची मागणी करून त्यापैकी दोन लाख रूपयांची लाच स्वीकारताना साताऱ्यातील सहायक कामगार आयुक्त संजय शामराव महानवर यांना लाच लुचपत विभागाने आज सापळा रचून रंगेहात पडकले आहे. 

यासंदर्भात लाच लुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार हे लेबर सप्लायर व संघटनेचे अध्यक्ष असून शिरवळ मधील कंपनीस कामगार पुरविण्याचे काम करतात. त्यांच्याकडील कामगारांची कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्यासाठी सहायक कामगार आयुक्त संजय महानवर यांनी अकरा लाख रूपयांची मागणी केली होती.

त्यांची आठ लाखांवर तडजोड झाली होती. यासंदर्भात संबंधित लेबर सप्लायरने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला होता. मागणी केलेल्या रकमेपैकी दोन लाख रूपये स्वीकारताना सहायक कामगार आयुक्त संजय महानवर यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे व अतिरिक्त पोलिस अधिकक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक अविनाश जगताप, पोलिस हवालदार तेजपाल शिदें, श्री. ताटे, श्री. खरात, श्री. काटकर, श्री. भोसले यांनी या कारवाईत सहभाग घेतला. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख